इचलकरंजीत ‘एक दुकान, एक झाड’

इचलकरंजीत ‘एक दुकान, एक झाड’

Published on

03336
-------------

इचलकरंजीत ‘एक दुकान, एक झाड’
व्हिजन ग्रीन सिटीची संकल्पना; उन्हाळ्यातील वाढते तापमान रोखण्यासाठी उपक्रम

ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.२४ : उन्हाळा आला की उन्हाचे चटके आणि सावलीची किंमत नागरिकांना समजू लागते.याबाबत नागरिकांतून केवळ सकारात्मक चर्चा दिसून येते. परंतु कृतीशील उपाय काही दिसत नाहीत.शहरातील व्हिजन ग्रीन सिटी संस्थेचे पर्यावरण योध्ये मात्र अवघे शहर थंड ठेवण्यासाठी पुढे आले आहेत.''एक दुकान,एक झाड'' ही संकल्पना राबवत दुकानदारांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. आतापर्यत ३० हून अधिक ठिकाणी झाडे लावली असून भर उन्हाळ्यात वाढते तापमान रोखण्यासाठी हा दूरदृष्टी उपक्रम अवघ्या शहरासाठी फायदेशीर आहे.
प्रामुख्याने पर्यावरणासाठी झटणाऱ्या व्हिजन ग्रीन सिटीचे शहराच्या पर्यावरण वाचवण्याच्या मोहिमेत मोठे योगदान आहे. शहरातील खवरे मार्केट हिरवेगार केले आहे. शहरातील अनेक मार्गही हिरवेगार करण्याच्या विविध संकल्पनाही या संस्थेकडून राबवल्या जात आहेत. त्यातीलच एक महत्वाची संकल्पना म्हणजे ''एक दुकान,एक झाड''. शहरातील प्रत्येक मार्गावरील दुकानदारांना वृक्षारोपणाबाबत जागृत करून झाडे लावण्याचा म्हत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील सोसायटी, अपार्टमेंट यासह अनेक भागात झाडांची संख्या टिकून आहे. मात्र प्रमुख मार्ग आहेत, अशा ठिकाणी झाडे दुर्मिळ झाली आहेत. रस्त्यांचे डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण यामुळे उन्हाळ्यात प्रमुख मार्गावर तापमान कमालीने वाढतच असते. त्यामुळे प्रमुख मार्गावर झाडे लावली तर वाढणारे तापमान रोखण्याचा प्रयत्न व्हिजन ग्रीन सिटी करत आहे.
झाडे लावून न थांबता झाडे जगवण्याच्या फार मोठ्या प्रक्रियेत या संस्थेकडून दुकानदारांना सामावून घेतले आहे. यामुळे झाड जगविण्याची जबाबदारी दुकानदार स्वीकारत आहेत. भर उन्हाळ्यात तापमान ४० पार करत आहे. अशा परिस्थितीत व्हिजन ग्रीन सिटी वाढत्या तापमानाच्या परिणामाचा आलेख दुकानदारांना समजावून सांगत वृक्षारोपणाबाबत प्रोत्साहित करत आहेत. यास दुकानदारांचाही प्रतिसाद चांगला आहे. शहर थंड ठेवण्यासाठी व्हिजन ग्रीन सिटीची ही धडपड पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांचे भविष्य जपणारी ठरली आहे.
- - - - - - - - - - - - -
प्रदूषण रोखणारी झाडे
प्रमुख मार्गावर प्रकर्षाने जाणवणारे प्रदूषण रोखण्याच्या उद्देशाने शोभिवंत झाडांऐवजी कार्बन डायऑक्साईड शोषणारी आणि ऑक्सिजन देणारी झाडे दुकानासमोर लावली जात आहेत. वड, कडुलिंब,पिंपळासारखे देशी वृक्ष जैवविविधतेला सहकार्य करतात. पिंपळ १०० टक्के तर कडूलिंब ७५ टक्के कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात.ही झाडे या उपक्रमातून लावली जात आहेत. शहरातील पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी झाडांचे वृक्षारोपण होत आहे.
- - - - - - - - -
झाडे ही केवळ व्यक्तिगत संपत्ती नाही तर ती निसर्गातील प्रत्येक घटकाची आहे. एकीकडे झाडे लावली जातात आणि दुसरीकडे समाजकंटकांमुळे झाडे शहरात असुरक्षित झाली आहेत. पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून लावलेले झाडाचे संगोपन झालेच पाहिजे. तरच नानाविध संकल्पनेतून शहर हिरवेगार होईल.
-गोपाल खंडेलवाल, सदस्य, व्हिजन ग्रीन सिटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com