
वाढदिवसानिमित्त वाचन संस्कृतीला बळ
06596
----
वाढदिवसानिमित्त वाचन संस्कृतीला बळ
डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या विनायक दुधाळचा स्तुत्य उपक्रम
घुणकी, ता.२२: व्हॉट्सॲप आणि मोबाईल गेम्सच्या जंजाळात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात सकस, दर्जेदार व मुलांचे भावविश्व समृद्ध करणारी पुस्तके दिल्यास विद्यार्थी पुन्हा वाचन संस्कृतीकडे वळतील. त्यातून समृद्ध विचारांचे सक्षम नागरिक घडतील या विचाराने डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या विनायक दुधाळ या विद्यार्थ्याने वाढदिवसानिमित्त पुस्तक भेट उपक्रम राबवला.
आजकालची तरुणाई वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली प्रचंड दिखाऊ, भपकेबाजपणा व गोंधळ घालताना दिसते. परंतु या अनावश्यक खर्चाला फाटा देत तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी विनायक दुधाळ याने वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यात अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने चावरे येथील चावराई माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सुमारे १०० हून अधिक पुस्तके भेट देवून वाचन संस्कृतीला बळ दिले आहे. विनायकचा हा उपक्रम निश्चितच तरुणाईला प्रेरणादायक आहे.
मुख्याध्यापक एस. एस. पाटील म्हणाले, ‘विनायकचा उपक्रम स्तुत्य असून विद्यार्थ्यांनी आपलाही वाढदिवस गरजूना मदत करुन साजरा करावा.’
विनायक दुधाळ म्हणाले,‘वाढदिवसावर अनावश्यक खर्चाला फाटा देण्याची प्रेरणा शिक्षक असलेल्या आई वडिलांकडून मिळाली.’
यावेळी डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी आशिष पाटील, ओंकार नाईक, वैभव पाटील, सागर जाधव, अनिकेत शिंदे, सोमनाथ चौगले, सत्यजित दळवी, प्रणव जिंगर, सुरज गायकवाड, प्रतीक पाटील यांनी विनायकच्या उपक्रमाचे स्वागत केले. अध्यापक सी. एस. पाटील, जे. बी. बिडकर, एस. एन. पाटील, एन. एस. कुंभार, ए. वाय. पाटील उपस्थित होते. एस. एस. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती ए. व्ही. वळगड्डे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..