सामंजस्य करार
विद्यापीठ-आयसीटीत सामंजस्य करार
कौशल्याची देवाण-घेवाण; अभियांत्रिकी शिक्षण, संशोधनाला मिळणार चालना
कोल्हापूर, ता. २३ : शिवाजी विद्यापीठाने उच्च गुणवत्तेचे अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधनासाठी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीसमवेत (आयसीटी, मुंबई) पाच वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार केला. करारावर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, आयसीटीतील अधिष्ठाता प्रा. डॉ. पद्मा व्ही. देवराजन यांनी स्वाक्षरी केली.
सहयोगी कार्यक्रम, इतर शैक्षणिक देवाण-घेवाण, शैक्षणिक आणि वैज्ञानिक सहकार्यावर आधारित परस्पर फायदेशीर संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. यातून नवीन तंत्रज्ञान-वर्धित संशोधन अपेक्षित आहे. हा सामंजस्य करार एक पाया असेल, नंतर आवश्यक असल्यास विशिष्ट विभागांसोबत स्वतंत्र सामंजस्य करार केले जातील.
सामंजस्य करारामुळे दोन्ही विद्यापीठांनी विविध संशोधन उपक्रम सुरू केले आहेत. त्याचे प्रस्ताव निधी संस्थांकडे सादर केले जातील. दोन्ही संस्थांमधील या समान स्वारस्य असणाऱ्यांना या सामंजस्य करारामुळे संयुक्त संशोधन आणि प्रकाशनाला आणखी गती मिळेल. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी आयसीटीच्या विद्यार्थी व प्राध्यापकांच्या सहकार्याने काम करून त्यांचे ज्ञान वाढवण्यासाठी करार उपयुक्त ठरेल. हे संयुक्त संशोधन आणि प्रकाशनांच्या शक्यता विकसित करण्यासाठी संयुक्त चर्चासत्रे, परिषदा, कार्यशाळा आयोजित करून प्रशासन आणि व्यवस्थापनाशी संबंधित अनुभव आणि कौशल्यांची देवाण-घेवाण करण्यास प्रोत्साहन दिले जाईल. करारप्रसंगी करारासाठी शिवाजी विद्यापीठातील प्रा. आर. जी. सोनकवडे, प्रा. के. वाय. राजपुरे, तर आयसीटीचे प्रा. आर. आर. देशमुख व प्रा. पी. आर. गागळे उपस्थित होते.
कोट
सामंजस्य करार प्राध्यापक, विद्यार्थी आणि इतर भागधारकांसाठी खूप उपयुक्त ठरेल. शिवाजी विद्यापीठाच्या विज्ञान विभागात, एसएआयएफ सीएफसी सेंटरसह आयसीटीच्या विविध कॅम्पसमध्ये उपलब्ध असणारी अत्याधुनिक उपकरणे वापरण्यासाठीचे कौशल्य एकमेकांस नक्की उपयुक्त ठरतील.
- प्रा. अनिरुद्ध पंडित, कुलगुरू, आयसीटी
अनेक प्रगत तंत्रे आणि कौशल्ये आयसीटी मुंबई येथे उपलब्ध आहेत. ज्यामुळे शिवाजी विद्यापीठातील विविध विज्ञान विभागांचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मदत होईल. तथापि दोन संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यासाठी अथक प्रयत्नांमुळे दोन्ही बाजूचे विद्यार्थी आणि प्राध्यापक सदस्यांना फायदा होईल.
-प्रा. आर. जी. सोनकवडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.