
कुस्ती
कुस्ती लढतीचे संग्रहित छायाचित्र वापरावे...
खासबाग मैदानात नोव्हेंबरमध्ये घुमणार शड्डू
देशभरातील मल्लांचा सहभाग; खासदार संभाजीराजे-बृजभूषण शरण सिंह यांच्यात चर्चा
कोल्हापूर, ता. २५ : राजर्षी शाहू छत्रपती महाराज याच्या स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूरच्या खासबाग मैदानात यंदा नोव्हेंबरमध्ये राष्ट्रीयस्तरावरील मातीतील कुस्ती स्पर्धेचे खासबाग मैदानात आयोजन करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती व भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यात झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. दरम्यान, पुढील नियोजनासाठी कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी व राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे सचिव यांची संयुक्त बैठक २ मे रोजी दिल्ली येथे होणार आहे.
काही दिवसांपूर्वी संभाजीराजे यांनी बृजभूषण यांची भेट घेऊन राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी कुस्तीसाठी दिलेले योगदानाची माहिती दिली होती. कुस्तीच्या उद्धारासाठी महाराजांनी जे उत्तुंग कार्य केले आहे, त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांच्या स्मृतिशताब्दी वर्षात कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानात राष्ट्रीयस्तरावरील मातीतील कुस्ती स्पर्धा भरवावी, अशी मागणी केली होती. त्यावेळीच त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली होती. आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत नोव्हेंबरमध्ये खासबाग मैदान येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करू, अशी ग्वाही बृजभूषण शरण सिंह यांनी संभाजीराजे यांना दिली.
३०० वर मल्ल
कुस्ती मैदान पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांत होईल. देशभरातील नामांकित असे ३०० हून अधिक पैलवान त्यात सहभागी होतील, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..