
शासकीय उद्यानात फुलांचा बहार
12307
शासकीय बागा बहरल्या;
मनपा बागा कोमेजल्या!
मोहन मेस्त्री : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ता. ८ : कोल्हापूरला बागांचे शहर म्हटले जायचे. ५४ हुन अधिक बागा महापालिका क्षेत्रात आहेत. १२० हुन अधिक कर्मचारी आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टाऊन हॉल उद्यान, प्रिन्स शिवाजी गार्डन आणि सर्किट हाऊसची बाग म्हणजे हिरवाई आणि रंगीबेरंगी पानाफुलांची बहार आहे. आणि महापालिकेच्या सर्वच बागा म्हणजे सुकलेली झाडे, मोडकी तुटकी खेळणी, कारंजे, ओसाड लॉन असे चित्र आहे. केवळ तीन निवृत्त कर्मचाऱ्यांनी फुलवलेल्या शासकीय बागा चर्चेचा विषय होत आहेत.
महापालिकेची रंकाळा चौपाटी म्हणजे पर्यटक आणि करवीरवासीयांसाठी रमणीय ठिकाण. हुतात्मा पार्क लॉन मुलांन मैदानाच होते. महावीर गार्डनमधील खेळणी आणि मत्स्यालयाचे आकर्षण होते. काही वर्षांपूर्वी रंकाळा पदपथ उद्यान आणि महावीर गार्डनसध्ये खेळण्यातील रेल्वेपण बसविण्याल्या होत्या.,सासने उद्यानात ट्रॅफिक गार्डन तयार केली होते. कसबा बावडा हनुमान तलाव चौपाटी तर मिनी रंकाळा चौपाटी होते. परंतु सध्या चांगल्या बागांची दुर्दशा झाली आहे.
शंभरहून अधिक कर्मचारी आणि पुरेसे पाणी असताना या बागांमधील झाडे सुकतातच कशी हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. दुसरीकडे शहराच्या मध्यवस्तीत असलेले प्रिन्स शिवाजी गार्डन, टाऊन हॉल उद्यान आणि सर्किट हाऊस या शासकीय बागा मात्र नागरिकांना आकर्षित करून घेत आहेत.या उद्यानाचे माळी सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झालेले आहेत. परंतु त्यांची कामावरील श्रद्धा पाहून तत्कालीन उद्यान अधीक्षक विजय रावळ (सध्या बदली मुंबई) यांनी तिघांनाही तीन बागांच्या देखभालीचा अघोषित ठेकाच दिला. आणि या तीनही लोकांनी त्याला सार्थ न्याय दिला. २०१४ मध्ये निवृत्त झालेले पांडुरंग चौगुले यांच्या देखरेखीखाली प्रिन्स शिवाजी गार्डन बहरलेली दिसत. सर्किट हाउसच्या बागेसाठी सुरेश चौगुले आणि टाऊन हॉल उद्यानामध्ये रंगराव शिंगाडे सहकाऱ्यांसोबत मेहनत घेत आहेत. टाऊन हॉल उद्यान तर मॉर्निंग वॉकरचा ट्रेक झाला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..