स्टार्टअप स्टोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्टार्टअप स्टोरी
स्टार्टअप स्टोरी

स्टार्टअप स्टोरी

sakal_logo
By

स्टार्टअप लोगो
--
12599
12600

‘रोबोटिक्स’द्वारे ज्ञानदानासह अर्थिक नफा
प्रतीक, विश्वजितचा अभिनव स्टार्टटप; शालेय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः त्या दोघांनाही रोबोटिक्समध्ये रुची होती, विद्यापीठाच्या कोणत्याही रोबोटिक्स स्पर्धेत त्यांचे अव्वल स्थान असायचे. त्यांच्या कौशल्याची दखल घेऊन त्यांनी ‘टीसीएस’सारख्या नामांकित कंपनीने नोकरी दिली; पण त्यांनी रोबोटिक्स तंत्रज्ञानातच काम करायचे ठरवले. यातूनच त्यांचा नवा स्टार्टअप सुरू झाला. आज ते शालेय विद्यार्थ्यांना अटल टिंकर लॅबच्या माध्यमातून रोबोटिक्स तंत्रज्ञानाचे धडे देतात. यातून त्यांनी आर्थिक नफा तर मिळवलाच पण मुलांत रोबोटिक्स तंत्रज्ञानाबद्दल जिज्ञासाही जागृत केली. प्रतीक पवार आणि विश्वजित खाडे अशी यांची नावे आहेत.
प्रतीक आणि विश्वजित हे दोघे आष्टा येथील आण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होते. याच काळात ते रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा अवलंब करून अनेक उपकरणे बनवायचे. या उपकरणांना विविध स्पर्धांत गौरवले जायचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर रोबोटिक्स तंत्रज्ञानातील कामांसाठी ‘टीसीएस’मध्ये त्यांची निवड झाली; मात्र या दोघांनी ही नोकरी नाकारली आणि स्वतःची ‘रॅबिट एन टॅरटाईज’ ही कंपनी सुरू केली. या माध्यनातून त्यांनी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा अवलंब करून विविध प्रकारची उत्पादने बवनवण्याचे काम सुरू केले. पुढे त्यांना नीती आयोगाच्या अटल टिंकर लॅब या योजनेतून कामाची संधी मिळाली. त्यांनी विविध शाळांत जाऊन विद्यार्थ्यांना रोबोटिक्त तसेच अन्य तंत्रज्ञानाची तोंड ओळख करून देणे. विविध उपकरणे बनवून घेणे. हे काम ते करतात. विद्यार्थ्यांना थ्रीडी डिझाईन, थ्रीडी प्रिंटिंग यासह अन्य बाबींची ओळख करून देणे, हे त्यांचे काम आहे.
सध्या कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी येथील सुमारे १५० पेक्षा जास्त शाळांत ते प्रशिक्षण देतात. त्यांच्याकडे ३० ते ३५ जणांचा स्टाफ आहे. त्यांची वार्षिक उलाढाल काही कोटींत आहे.

थॅरोटिकल नाही प्रॅक्टिकल
प्रतीक पोवार सांगतात, ‘कंपनीत जे काम करतो, ते ९० टक्के प्रॅक्टिकल असते. अभियांत्रिकी शिक्षण घेणारे बरेच विद्यार्थी प्रशिक्षणासाठी काम करतात. त्यांना रोबोटिक्सचा उपयोग करून प्रत्यक्ष उपकरणे बनवण्यास शिकवतो आणि त्यांच्याकडून करून घेतो. त्यामुळे त्यांच्यात कौशल्याबरोबरच व्यावहारिक दृष्टिकोन तयार होतो. उपकरणे बनवताना येणाऱ्या अडचणींवर ते स्वतः मात करतात. उद्योजकांनी विकसित केलेल्या संकल्पनेला उत्पादनात रुपांतरित करतो.’
--------------
मुलांत तंत्रज्ञानाची आवड
विश्वजित खाडे सांगतात, ‘शालेय वयातच विद्यार्थ्यांत तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी. विविध तंत्रज्ञानाची त्यांना ओळख व्हावी हाच अटल टिंकर लँबचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांकडून ड्रोन, फोर्म बोर्डचे विमान तयार करून घेतो. हे विमान २ किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. एखादे उपकरण बनवल्यानंतर मुलांत जो आनंद, उत्साह पाहायला मिळतो. त्याचे समाधान मिळते.’