

12940
‘कोल्हापूर इंजिनिअरिंग’च्या
पदाधिकाऱ्यांची केआयटीला भेट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘केआयटी’ महाविद्यालयास भेट दिली. उद्योग, शिक्षण संस्थांमधील ऋणानुबंध दृढ करत उद्योग क्षेत्राचे सध्याचे प्रश्न शैक्षणिक संस्थांमधील तज्ज्ञांकडून, विद्यार्थ्यांकडून कसे सोडवून घेतले जातील याबद्दल चर्चा केली.
कोल्हापुर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन, उपाध्यक्ष भूषण दलाल, सचिव दिनेश बुधले, खजिनदार कमलाकांत कुलकर्णी, संचालक अतुल आरवाडे, श्रीकांत दुधाणे, प्रसन्न तेरदाळकर, जयदीप मांगोरे यांनी चर्चा केली.
संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दिपक चौगुले यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक डॉ. विलास कार्जिन्नी यांनी महाविद्यालयाची वाटचाल, विविध उपक्रमांची माहिती दिली. प्रा. सुभाष माने यांनी आयडिया लॅबची तर डॉ. सचिन शिंदे यांनी केआयटीतील स्टार्टअप्स, इन्क्युबेशन अंतर्गत येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रभारी संचालक डॉ. मनोज मुजुमदार यांनी आभार मानले. प्रा. क्षितिज ताशी यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.