

महिलेची किडनी
घेऊन फसवणूक
पुण्यातील रॅकेट जिल्ह्यात; १५ लाख देण्याचे दाखविले आमिष
जयसिंगपूर, ता. ६ : फसवणूक करून किडनी विक्रीचे धागेदोरे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहेत. शिरोळ तालुक्यातील कर्जबाजारी महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन पंधरा लाखांना तिची किडनी विकून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पुण्यात घडल्याने याबाबतची नोंद तेथील पोलिसात करून महिलेने आज प्रकार उघड केला.
संबंधित महिलेने कर्जापोटी पुण्यात पंधरा लाख रुपयाला किडनी विकली. मात्र पुण्यातील एंजटांनी किडनी काढून घेऊन फसवणूक केली. याबाबत त्यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली.
संबंधित महिला तिची बहिणीशी संपर्क केला असता एक महिला म्हणाली, पती नसल्याने दिव्यांग मुलासह दोन मुलांना सांभाळ करीत आहे. लॉकडाउनध्ये एका एजंटाने पैशांच्या बदल्यात किडनी विकण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यातून पंधरा लाख रुपये देण्याचे आणिष दाखविले. गेल्या आठवड्यात किडनी तरुणीला दिली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे आमचे पैसे द्यावेत, अशी मागणी केली. मात्र एजंटाने टाळाटाळ केली. चालता व उठता येत नसतानाही रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर थेट पोलिसांत तक्रार दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.