जांबरे परिसरातील हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जांबरे परिसरातील हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी
जांबरे परिसरातील हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी

जांबरे परिसरातील हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी

sakal_logo
By

जांबरे परिसरातील हत्तींचा
बंदोबस्त करण्याची मागणी
विष्णू गावडे; अन्यथा शेतकऱ्यांचे पुनर्वसन करावे
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ७ : जांबरे-उमगाव (ता. चंदगड) परिसरातील हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकऱ्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी जांबरेचे सरपंच विष्णू गावडे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी निवेदने पाठवली आहेत.
जांबरे, उमगाव, सावतवाडी, धुरीवाडी, माळी, पेडणेकरवाडी, न्हावेली, खळणेकरवाडी, हेरे, खामदळे, गुडवळे, पिळणी, कानूर, पुंद्रा, बिजूर, काजिर्णे, भोगोली, अडकूर, केंचेवाडी, कोकरे, अडूरे, नागवेस वाघोत्रे, कोळिंद्रे या भागात गेल्या पंधरा वर्षांपासून हत्तींचा वावर आहे. काबाडकष्टाने पिकवलेली शेती हत्तींच्या कळपाकडून बघताबघता उद्‌ध्वस्त होते. वन विभाग पंचनामे करतो, परंतु मिळणारी भरपाई तुटपुंजी असते. त्यापेक्षा पिकावर झालेला खर्च अधिक असतो. दरवर्षीच्या या त्रासाला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी शेतात पीक घेणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने एक तर या वन्य प्राण्यांचा योग्य बंदोबस्त करावा, अन्यथा शेतकऱ्यांचे योग्य जागेत पुनर्वसन करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..