दरेकर बातमी

दरेकर बातमी
Published on

१३३४२

निष्ठावंत शिवसैनिकांमध्येच नाराजी
प्रवीण दरेकर ः हिंदुत्वापासून दुरावलेल्या शिवसेनेमुळे फायदा भाजपला

कोल्हापूर, ता. ७ ः शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित अ‍सणाऱ्या हिंदुत्वापासून शिवसेना दूर गेली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पत्ता कापला. त्यामुळे खऱ्या शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. परिणामी ९० टक्के कट्टर शिवसैनिक भाजपलाच मतदान करतील, असा दावा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केला.
ताराबाई पार्क गार्डन येथे चाय पे चर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. महिलांवरील वाढत्या अत्याचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून सतेज पाटील यांनी गृहराज्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही दरेकर यांनी केली. यावेळी ताराबाई पार्क, नागाळा पार्क,
शाहूपुरी या भागातील अनेक नामवंत व्यापारी, डॉक्टर्स, उद्योजक यांच्यासह सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.
दरेकर म्हणाले, सत्यजित कदम यांची कार्यक्षमता आणि कामाचा आवाका माहीत असल्याने कोल्हापूरकरांचा प्रतिसाद वाढत आहे.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक म्हणाले, ‘प्रत्येकवेळी थेट पाईपलाईन योजनेची नवीन तारीख सांगितली जाते. त्यातून कोल्हापूरकरांची क्रूर चेष्टा सुरू आहे.’
भाजप हा देशात पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत असून, कोल्हापूर उत्तरचे प्रश्‍न सोडवण्यासाठी पाठबळ द्या, अशी विनंती कदम यांनी केली. देवस्थान समितीच्या माजी सदस्या संगीता खाडे यांनी भाजपमध्येच महिलांचा खरा आत्मसन्मान राखला जातो, असे स्पष्ट केले.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, माजी नगरसेवक नीलेश देसाई, पल्लवी देसाई, विजयसिंह खाडे-पाटील, एम. एम. चौगुले, राजू शेठ, बाबासाहेब पाटील, अशोक रामचंदाणी, नरेश चंदवाणी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Sugar Season 2026
UPI Transaction Charges on Payments
Gokul election 2026 Mahayuti formula in Kolhapur
Amal Mahadik Reveals BJP Strategy After Chandrakant Patil's Crucial Meeting
Marathi News Esakal
www.esakal.com