१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

मत-मतांतरे
---------

शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्राची घसरण
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गुणवत्तेच्या अहवालात महाराष्ट्राची घसरण झाल्याचे दिसून आले. निती आयोग, मनुष्यबळ विकास मंत्रालय व जागतिक बँक यांच्या प्रयत्नातून शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यासाठी सर्व राज्यांची मूल्यांकन तपासणी करण्यात आली. यात २० मोठ्या राज्यांच्या गटात महाराष्ट्राची घसरण झाल्याचे नोंदविण्यात आले. याउलट गुजरात, हरियाना, हिमाचल प्रदेश या राज्यांनी मोठी प्रगती केल्याचे दिसून आले. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यात अशा तऱ्हेची शैक्षणिक क्षेत्रातील घसरण ही निश्‍चितच भूषणावह नाही. सरकारने या अहवालाचा योग्य तो अभ्यास करून यातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करावा.
पी. एस. कुलकर्णी, कोल्हापूर

प्रश्‍न कोल्हापूर-सांगलीच्या अस्तित्वाचा
२०२१ च्या महापुरात नागरिकांचे झालेले नुकसान २०१९ च्या महापुराइतके नाही. पण, होणारे नुकसान ऐतिहासिक शहरांना, किनारी गाव व शेतपिकांना परवडण्यासारखे नाही. पावसाळा म्हणजे उरात धडकी भरवणारा ऋतू आहे. जुलै, ऑगस्टमधील हा अतिपाऊस आणि त्यात कर्नाटक सरकार धरणाची उंची वाढवत आहे. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांना घोरात टाकले आहे. धरणाची उंची वाढविण्याची दर्पोक्ती केंद्र सरकार व राज्याला आव्हान करण्यासारखे आहे, तर कर्नाटक सरकारचा हा उद्यमपणा वेळीच हाणून पाडला पाहिजे. सांगली-कोल्हापूर हे जिल्हे साखरपट्ट्यातील गावे असल्याने येथील शेती व शेतकरी यांच्या सहनशीलतेचा हा अस्तित्वाचा विचार करून अलमट्टीचा प्रश्‍न मिटवा व कोल्हापूर-सांगलीला निर्धास्त जीवन जगू द्या.
रावसाहेब शिरोळे, रुकडी (जि. कोल्हापूर)

तरुणाईची ऊर्मी
अलीकडे नवीन पिढी सर्व स्वतः करण्याची ऊर्मी दाखवते, हे योग्यच आहे. ही तरुण पिढी इंटरनेटच्या युगातील असल्याने जागतिकीकरणाशी समरस आहे. काही जण पालकांशी चर्चा करून लग्न करतात, तर काही जण स्वतःच जोडीदाराची निवड करून जातीव्यवस्थेकडे पाहत नाहीत. नवीन परिवर्तनीय विचारांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’, डबल इन्कम, नो किड्‍स याबाबत विचारही करायला भाग पाडतात. करिअरचा विषय महत्त्वपूर्ण आहेच. पण, त्यासाठी द्यावा लागणारा वेळ, कौटुंबिक जबाबदारी यांची सांगड कशी घालता येईल?
माधुरी कुंभीरकर, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर)

राष्ट्रीय हिताचा विचार व्हावा
कोरोनाचे संकट, व्यापार, उद्योगधंदे, आर्थिक मंदी, बेरोजगारी, स्थलांतरित मजुरांचे प्रश्‍न, कायदा व सुरक्षा व्यवस्था असे अनेक प्रश्‍न समोर असूनही राजकीय व्यक्ती एकमेकांवर आरोप करण्याबरोबरच महापालिका, लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. जनतेच्या प्रश्‍नांबाबत त्यांना सोयरसुतक नाही. मतदारांना विविध मार्गांनी आमिष दाखविल्याने जनता मत देते, हे या राजकीय पक्षांना कळून चुकले आहे. एकूणच, ही बेबंदशाही म्हटली पाहिजे. म्हणूनच सर्वांचे हित पाहणारे उमेदवार निवडून येणे आवश्‍यक आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्‍न तत्काळ मार्गी लागतील.
अनिशा कोटगी, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर)

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..