मशिनमध्ये सापडून कारखानदाराचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मशिनमध्ये सापडून कारखानदाराचा मृत्यू
मशिनमध्ये सापडून कारखानदाराचा मृत्यू

मशिनमध्ये सापडून कारखानदाराचा मृत्यू

sakal_logo
By

13329
मशिनमध्ये सापडून
कारखानदाराचा मृत्यू
पंचतारांकित एमआयडीसीमध्ये दुर्घटना
पट्टणकोडोली, ता. ७ ः मशिनमध्ये डोके सापडून एक कारखानदार गंभीर जखमी झाला. त्यांचा सीपीआरमध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सागर महादेव स्वामी (वय ३६, रा. बेलबाग, मंगळवार पेठ, सध्या रा. पाचगाव) असे त्यांचे नाव आहे. कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये आज सायंकाळी सुमारास ही घटना घडली. सीपीआर पोलिस चौकीत याची प्राथमिक नोंद झाली.
याबाबत नातेवाईक व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः स्वामी यांचा पंचतारांकित एमआयडीसीमध्ये गौरीहार इंजिनिअरिंग वर्क्स (प्लॉट क्रमांक बी १७) हा कारखाना आहे. या कारखान्यात ते स्वतःच काम करतात. ते आज दुपारी मशिनवर काम करत होते. त्यांनी सायंकाळी चारच्या सुमारास एका मित्राला तेथे बोलवून घेतले. दरम्यान, ते मशिनवरील काम डोकावून पाहात होते. त्याचवेळी त्यांचे मशिनमध्ये डोके अडकले. त्यात त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. यावेळी मोठा आवाज झाला आणि स्वामी जोराने ओरडले. त्यांना त्यांच्या मित्राने मशिनमधून बाजूला केले आणि तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र उपाचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. त्यांच्या मागे पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, सहा महिन्यांची मुलगी, आई-वडील असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..