तरुणांच्या भविष्यासाठी भाजपला मत द्या ः उदयनराजे भोसले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणांच्या भविष्यासाठी भाजपला मत द्या ः उदयनराजे भोसले
तरुणांच्या भविष्यासाठी भाजपला मत द्या ः उदयनराजे भोसले

तरुणांच्या भविष्यासाठी भाजपला मत द्या ः उदयनराजे भोसले

sakal_logo
By

तरुणांच्या भविष्यासाठी
भाजपला साथ द्या
छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ ः काँग्रेस, राष्ट्रवादी हे पक्ष फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात; पण त्यांच्या विचारांप्रमाणे वागत नाहीत. त्यांनी सत्तेचा उपयोग केवळ घरे भरण्यासाठी केला. भाजप हा सर्वसामान्यांना पद आणि प्रतिष्ठा देणारा पक्ष आहे. त्यामुळे तरुणांच्या भविष्यासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या पाठीशी राहा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, ‘‘लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला. त्यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. सर्वसामान्य व्यक्तीच्या उन्नतीचा त्यांनी विचार केला. आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात. पण त्यांच्या विचारांप्रमाणे वागतात का? याचा विचार केला पाहिजे. या पक्षांनी राज्यात जातीयवाद पसरवला. त्यांनी सत्तेचे केंद्रीकरण आपल्याच घरात केले. आपल्यानंतर मुलगा, मग नातू यांनाच पदे दिली. त्यांनाच आमदार, खासदार केले; पण भाजप पक्ष यापेक्षा वेगळा आहे. भाजपने सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना नेतृत्व करण्याची संधी दिली. जो लोकांची सेवा करतो त्याला उमेदवारी दिली जाते. ही केवळ एक पोटनिवडणूक नाही. ही एक वैचारीक लढाई आहे. त्यामुळे तरुणांनी आपल्या भविष्यासाठी भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांना निवडून द्यावे.’’

युती तोडून काय मिळाले?
शिवसेनेबाबत उदयनराजे म्हणाले, ‘‘युतीतून शिवसेना बाहेर पडली. त्यामुळे काय साध्य झाले. युतीमध्ये चांगले चालले होते. आज शिवसेना आणि शिवसैनिकांची काय स्थिती आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या या पक्षाने आता विचार केला पाहिजे.’’

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top