फुले शाहू आंबेडकर सप्ताह व्याख्याने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुले शाहू आंबेडकर सप्ताह व्याख्याने
फुले शाहू आंबेडकर सप्ताह व्याख्याने

फुले शाहू आंबेडकर सप्ताह व्याख्याने

sakal_logo
By

13930

पंजाबराव देशमुख हे फुले, शाहूंचे
वैचारिक वारसदार : डॉ. मोहिते

कोल्हापूर, ता. १० : ‘‘डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेती, शिक्षण, सहकार आणि अस्पृश्यता निवारण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी कर्मकांडाला आणि जातीभेदाला विरोध दर्शविला. देवस्थानच्या उत्पन्नाचा उपयोग शिक्षण आणि आरोग्यासाठी केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. समाजपरिवर्तनासाठी त्यांनी क्रांतिकारक कृतिशीलता दाखविली. पंजाबराव देशमुख हे फुले-शाहूंचे वैचारिक वारसदार होते,’’ असे प्रतिपादन डॉ. अंबादास मोहिते यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे आयोजित फुले शाहू आंबेडकर सप्ताहांतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख स्मृतिदिनानिमित्त ‘डॉ. पंजाबराव देशमुख यांचे समाजपरिवर्तन कार्य’ यावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. केंद्राचे संचालक प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते.
डॉ. मोहिते म्हणाले, ‘‘पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी निष्ठेने लढा दिला. दिल्लीमध्ये जागतिक कृषी प्रदर्शन त्यांनी भरविले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला पूरक असे कार्य त्यांनी केले. जातीभेद नष्ट झाला पाहिजे, यासाठी मंदिर प्रवेश आंदोलन चालविले. ते यशस्वी केले. शिक्षण सक्तीचे करण्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले.’’
प्रा. महाजन म्हणाले, ‘‘डॉ. पंजाबराव देशमुख हे कृषक क्रांतीचे जनक होते. समाजपरिवर्तनासाठी त्यांनी केलेले कार्य महत्त्वाचे आहे. त्यांना पूर्व महाराष्ट्राचे कर्मवीर म्हटले पाहिजे. तसेच शेतकरी कर्जमुक्तीचा त्यांचा प्रयोग आजही मार्गदर्शक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना स्वतंत्र मजूर पक्षाच्या प्रथम कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवडले होते. तसेच घटना समितीचे सदस्य म्हणून भाऊसाहेबांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण ठरले आहे. डॉ. आंबेडकरांनी भाऊसाहेबांचा त्यासाठी गौरवपर उल्लेख केला आहे.’’
प्रा. अमोल मिणचेकर यांनी स्वागत केले. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. प्रा. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top