
राजगोळी बुद्रूक सेवा संस्थेवर शेतकरी विकास आघाडीची सत्ता
13980
राजगोळी बुद्रूक ः येथे आनंद साजरा करताना भरमलिंग सेवा संस्थेचे विजयी उमेदवार.
राजगोळी बुद्रूक सेवा संस्थेवर
शेतकरी विकास आघाडीची सत्ता
सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. १० ः राजगोळी बुद्रूक (ता. चंदगड) येथील भरमलिंग विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत शेतकरी विकास आघाडीने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवून विरोधी भरमलिंग शेतकरी विकास आघाडीचा पराभव केला. निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी खंदाळे यांनी निवडणूक निकाल जाहीर केल्यानंतर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळन करत आनंद साजरा केला.
सकाळी आठ वाजता मतदानाला सुरवात झाली. ४४५ मतदारांपैकी ४२८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १३ जागांपैकी शेतकरी विकास आघाडीची १ जागा बिनविरोध निवडून आली असल्याने १२ जागांसाठी निवडणूक लागली होती. निवडणूकीत भरमलिंग शेतकरी विकास आघाडी व शेतकरी विकास आघाडीत काट्याची टक्कर झाली. निवडणूकीत चुरस असल्याने बाहेर गावच्या मतदाराना स्वतंत्र वाहनांतून आणण्याची व्यवस्था केली होती. विजयी उमेदवार असे; अनिल रामचंद्र गुरव, पोमाना निंगाप्पा पाटील, मष्णू रामचंद्र पाटील, यल्लापा पुन्नापा भरमगावडा, निंगाप्पा हिरोजी पाटील, पांडूरंग पुंडलिक भरमगावडा, तुकाराम नारायण पाटील, बसय्या पोवाड्याप्पा स्वामी, नर्मदा नारायण पाटील, शांता विष्णू चौगुले, बाबू आन्नापा लोहार व अशोक भारती. विजयी शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्त्व पोमाना पाटील, भावकू गुरव,नारायण माने, भरमू धनू पाटील व भरमू मंगाजी पाटील यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..