
खिस्ती बांधव
14010
झावळ्याच्या रविवार सणानिमित्त रॅली
कोल्हापूर ः ख्रिस्ती बांधवांच्या झावळ्याच्या रविवार या सणानिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली. वायल्डर मेमोरियल चर्च, ख्राईस्ट चर्च, विक्रमनगर चर्च आदीसंह सर्वत्र चर्चमधून रॅली आणि विशेष प्रार्थनासभेचे आयोजन केले होते. होसान्ना प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादीत असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
वायल्डर मेमोरियल चर्चतर्फे सिटी चर्चपासून रॅलीला सुरवात झाली. शहराच्या विविध मार्गावरुन ही रॅली न्यू शाहूपूरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये समाप्त झाली, तर नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्चने महावीर गार्डन येथून रॅलीला सुरवात केली.जिल्हाधिकारी कार्यालयापासून ही रॅली नागाळा पार्क येथील ख्राईस्ट चर्चमध्ये समाप्त केली. विक्रमनगर चर्चनेही परिसरात रॅली काढली. या रॅलीमध्ये चर्चमधील ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले सहभागी झाली. शुक्रवारी गुड फ्रायडेनिमित्त विशेष प्रार्थना सर्वच चर्चमधून आयोजित केल्या आहेत. या दिवशी प्रभू येशूनी वधस्तंभावरुन उद्गारलेल्या सात वाक्यावर संदेश होणार आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..