राघवेंद्र स्वामी मठात रामनवमी उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राघवेंद्र स्वामी मठात रामनवमी उत्साहात
राघवेंद्र स्वामी मठात रामनवमी उत्साहात

राघवेंद्र स्वामी मठात रामनवमी उत्साहात

sakal_logo
By

फक्त फोटो
14039
कोल्हापूर ः खरी कॉर्नर जवळील पुरातन श्री राघवेंद्र स्वामी मठात श्रीरामनवमी उत्साहात झाली. दोन वर्षाच्या कोरोनानंतर आज रामनवमीसाठी भक्त मोठ्या संख्येने जमले. बंगळूरवरून आलेल्या सुंदर फुलांची सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई मंदिरास करण्यात आली. श्री. भावे व परिवार यांच्यातर्फे तेरा वेळा श्री रामरक्षा पठण झाले. बारा वाजून वीस मिनिटांनी राम जन्मोत्सव सोहळा झाला. के. रामराव, आचार्य सुब्रम्हण्यम, रवी कासनीस, भीमसेन कुलकर्णी, मयूर कुलकर्णी यांचा विशेष सहभाग होता.
-
कोतोलीत महाप्रसादाचे वाटप
माजगाव : कोतोली (ता.पन्हाळा) सुतारवाडा येथे श्री रामनवमी ''निमित्त '' श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील ९ व्या व १२ व्या अध्यायाचे पारायण व अखंड हरिनाम सोहळा झाला.यावेळी ह.भ.प.मारूती जाधव यांचे प्रवचण तर ह.भ.प.भिकाजी शिंदे यांचा किर्तनाचा कार्यक्रम झाला.यावेळी महाप्रसाचा भाविकांनी लाभ घेतला.
-
कोडोलीत रामरक्षा मंत्राचे पठण
कोडोली : कोडोली येथील दत्त मठी येथे रामनवमी उत्साहात धार्मिक वातावरणात साजरी झाली. राममंदिरमध्ये रामनवमीनिमित पहाटे मूर्तीस अभिषेक घालून आरती करण्यात आली. त्यानंतर दिवसभर रामजप करण्यात आला. रामरक्षा मंत्राचे पठण करण्यात आले. यावेळी प्रविण बुराडे यांनी रामजप व रामरक्षा मंत्राचे पठण भाविकांच्याकडून करून घेतले . यावेळी महिलांच्यासह अनेक भाविकांनी सहभाग घेतला होता.
-

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top