Gag113_txt.txt

Gag113_txt.txt
Published on: 

14271
कोदे : तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील, व खेळाडू.

गगनबावडा प्रीमियर लीग
स्पर्धेत कोदे संघाला विजेतेपद


गगनबावडा, ता. १२ ः गगनबावडा प्रीमियर लीग आयोजित '' गगनबावडा प्रीमियर लीग ‘२०२२‘ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत कोदे येथील क्रिकेट संघाने विजेतेपद पटकावले. तर सांगशी येथील क्रिकेट संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धा कोदे येथील मैदानावर झाल्या. तालुक्यातील ८ संघातून १५० स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला. सांगशी संघाने सहा महिन्यापूर्वीच असळज येथील क्रिकेट स्पर्धेत चांगली कामगिरी करत विजेतेपद पटकावले होते. विजेत्या संघास ५१ हजार व चषक, तर उपविजेत्या संघास ३० हजार व चषक अशी बक्षिसे होती. मालिकावीर म्हणून आदिनाथ कोटकर,(साखरी संघ), उत्कृष्ट फलंदाज पांडुरंग महाडिक, (तिसंगी संघ,) उत्कृष्ट गोलंदाज अनिल पेजलेकर (सांगशी संघ). तर अटीतटीच्या अंतिम सामन्यात सुहास पांगळे (कोदे संघ) याने चमकदार कामगिरी करून विजेतेपदावर संघाचे नाव कोरले. बक्षीस समारंभ तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्या उपस्थित झाला.यावेळी राजेश पाटील, विलास पाटील, अभय कोटकर अनेक खेळाडू, व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Madhuri the elephant, whose rehabilitation at Vantara is being sought again by PETA India through the Supreme Court
Gokul Milk Union Election Mahayuti Seat-Sharing Formula
Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Marathi News Esakal
www.esakal.com