
महावीर जयंती
महावीर जयंतीनिमित्त
आजपासून कार्यक्रम
कोल्हापूर, ता. १३ ः भगवान महावीर जयंतीनिमित्त उद्या (बुधवार) पासून भगवान महावीर प्रतिष्ठानतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. बुधवार (ता.१३) सकाळी पाऊणेआठ वाजता अहिंसा ज्योत व शांतता फेरी होणार आहे. महावीर गार्डनपासून फेरीला प्रारंभ होईल. त्यानंतर किरण बंगला, मध्यवर्ती बस स्थानक, शाहूपुरी जैन मंदिर, व्हिनस कॉर्नर, कोंडा ओळ, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, पापाची तिकटी, गंगावेसमार्गे पार्श्वनाथ मानस्तंभ मंदिर येथे फेरीचा समारोप होईल. गुरुवारी (ता.१४) महावीर जयंती असून, सकाळी विविध धार्मिक विधी होतील. सकाळी पाऊणेआठ वाजता पार्श्वनाथ मानस्तंभ मंदिरापासून शोभायात्रेला प्रारंभ होईल. भेंडे गल्ली, शिवाजी चौक, लक्ष्मी रोड, महाराणा प्रताप चौक, आईसाहेब महाराज पुतळा, दसरा चौक, दिगंबर जैन बोर्डिंग असा शोभायात्रेचा मार्ग असेल. दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये सायंकाळी साडेचारला दीपक धडोती यांचे ‘वर्तमानातील जैन विश्व’ या विषयावर व्याख्यान होईल.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..