क्रिप्टो करन्सीचे स्वरुप समजून घेण्याची गरज ः डॉ. विजय ककडे

क्रिप्टो करन्सीचे स्वरुप समजून घेण्याची गरज ः डॉ. विजय ककडे

13480
चंदगड ः र. भा. माडखोलकर महाविद्यालयात क्रिप्टो करन्सी संदर्भात मार्गदर्शन करताना डॉ. विजय ककडे. शेजारी प्राचार्य डॉ. पाटील, डॉ. सावंत आदी.

क्रिप्टो करन्सीचे स्वरूप
समजून घेण्याची गरज
डॉ. विजय ककडे; माडखोलकर महाविद्यालयात एकदिवसीय कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १३ ः क्रिप्टो करन्सी (कूट चलन) हे एक प्रकारचे आभासी चलन असून त्याच्या चलनवलन व्यवस्थेचे स्वरूप समजून घेण्याची गरज आहे, असे मत डॉ. विजय ककडे यांनी व्यक्त केले. येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयात गडहिंग्लज येथील शिवराज अग्रणी महाविद्यालय अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते.
डॉ. ककडे म्हणाले, ‘‘क्रिप्टो करन्सी हा डिजिटल क्रांतीचा अपरिहार्य भाग आहे. त्यासाठी विकसित तंत्रज्ञानाची गरज आहे. या चलनाचे फायदे आहेत, तसेच त्यात काही संभाव्य धोकेही आहेत. या चलनाला भारत सरकारने परवानगी दिली असली तरी अद्याप चलन म्हणून मान्यता नाही.’’ प्राचार्य पाटील म्हणाले, ‘‘विद्यार्थिदशेतच गुंतवणुकीच्या नवनवीन पर्यायांची माहिती घ्यायला हवी. भविष्यकाळात उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण झाल्यावर गुंतवणूक करणे सोपे जाईल.’’ डॉ. के. पी. वाघमारे, प्रा. व्ही. पी. प्रधान, प्रा. व्ही. डी. पाटील, ताशिलदार, डॉ. एम. एम. माने, एम. एम. पिरजादे यांच्यासह आजरा, चंदगड, गडहिंग्लज विभागातील समन्वयक, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. समन्वयक डॉ. एस. एस. सावंत यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला. डॉ. आर. ए. कमलाकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. व्ही. के. गावडे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com