
फुले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना स्वराज्य हॉस्पीटलमध्ये कार्यान्वित
फुले, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना
स्वराज्य हॉस्पिटलमध्ये कार्यान्वित
गडहिंग्लज, ता. १७ : येथील संकेश्वर रोडवरील स्वराज्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्यान्वित झाल्याची माहिती कार्यकारी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजित पाटोळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, ‘‘गडहिंग्लज शहरात उपचारासाठी पाच तालुक्यांतून रुग्ण येतात. कोल्हापूर, बेळगाव, पुण्याच्या ठिकाणी उपचार घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. यामुळे अशा मोठ्या शहरात मिळणाऱ्या आरोग्य सुविधा ग्रामीण रुग्णांना देण्यासाठी सर्वसोयींनी युक्त पंचतारांकित स्वराज्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारले. यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केडीसीसी बँकेच्या माध्यमातून बळ दिले. कोरोना महामारीत हॉस्पिटलने ३०० रुग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचविले. १९ डिसेंबर २०२१ पासून हॉस्पिटल प्रत्यक्ष सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले.
आता जन आरोग्य योजनेंतर्गत आर्थोपेडीक, मेडिसीन, आयसीयू, एनआयसीयू, बालरोग, जनरल सर्जरी, कान, नाक, घसा, युरॉलॉजी, प्लास्टिक सर्जरी आदी विभागामध्ये सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया होतील. अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अजित पाटोळे, मेडिसीन तज्ज्ञ डॉ. अनिल मुंडे, बालरोग तज्ज्ञ डॉ. युवराज पाटोळे, जनरल सर्जन डॉ. प्रवीण जाधव, कान-नाक व घसा तज्ज्ञ डॉ. मुकुंद जाधव, डॉ. गणेश तारळेकर, आहारतज्ज्ञ डॉ. सुरेखा पाटोळे, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. स्मिता पाटील, प्लास्टिक सर्जन डॉ. मयूरेश देशपांडे, न्यूरो सर्जन डॉ. उदय घाटे आदी तज्ज्ञ डॉक्टर्स व अनुभवी नर्सिंग स्टाफ कार्यरत आहे. येथे ४० बेडची सुविधा असून दोन सुसज्ज मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहेत. ११ बेडचे अतिदक्षता विभागही सेवेत आहेत. याशिवाय सर्व विभागात अल्प व माफक दरात रुग्णावर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..