न्यू कॉलेजमध्ये शाहू पुण्यतिथी
16176
कोल्हापूर : लोकराजा कृतज्ञतापर्व कार्यक्रमांतर्गत बोलताना एम. बी. शेख.
तरूणांची मानसिकता बदलावी : शेख
कोल्हापूर, ता. १९ : ‘‘तरूणांसमोर आदर्श निर्माण व्हायला हवेत. उद्योजकता हे विज्ञान नाही. उद्योग हा तुम्हाला प्रयत्नपूर्वक उभा करावा लागतो. आज कम्युनिकेशन सिस्टिममध्ये आमुलाग्र बदल झाले. त्यामुळे तरूणांची मानसिकता बदलावी,’’ असे मत उद्योजक एम. बी. शेख यांनी व्यक्त केले.
न्यू कॉलेज, जिल्हाप्रशासन आणि शिवाजी विद्यापीठातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या पुण्यतिथीनिमित्त लोकराजा कृतज्ञतापर्व कार्यक्रमांतर्गत ‘स्टार्टअप, इनोव्हेशन, उद्योजकता विकास’ यावर व्याख्यान झाले. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त संजय माळी यांनी कृतज्ञता पर्वांतर्गत विविध कार्यक्रमांची माहिती दिली. रोजगाराविषयी कौशल्य विकासाविषयी सांगितले. प्रवीण कायंदे यांनी शासनाच्या विविध रोजगार योजना, स्वयंरोजगारावर मार्गदर्शन केले. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन के. जी. पाटील अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी स्वागत केले. संस्थेचे उपाध्यक्ष डी.जी. किल्लेदार, खजानीस वाय. एस. चव्हाण, समन्वयक डॉ. ए. ए. कलगोंडा उपस्थित होत. डॉ. मनिषा नायकवडी यांनी सूत्रसंचालन केले.
डॉ. आर. डी. ढमकले यांनी आभार मानले.
...
‘पेन्शनर’च्या तक्रारीचे निरसनसाठी वेबिनार
कोल्हापूर : कर्मचारी भविष्य निधी संघटन क्षेत्रीय कार्यालयातर्फे शुक्रवारी (ता. २२) आझादी का अमृत महोत्सवानिमित्त ‘पेन्शनर’च्या तक्रारीचे निरसन करण्यासाठी वेबिनारचे आयोजन सायंकाळी चार ते पाच वेळेत ताराबाई पार्क येथील कार्यालयात केले आहे. या संदर्भात ज्या सभासद पेन्शनरच्या काही तक्रारी, अडचणी किंवा कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत प्रश्न असतील त्यांनी आपले अर्ज ro.kolhapur@epfindia.gov.in ई-मेलवर २१ पर्यंत सायंकाळी चारपर्यंत मेल स्वरुपात सादर करावेत. ई-मेलमध्ये सभासदांनी आपला पिपिओ नंबर नमूद करावा. तसेच आपणास या संदर्भाची लिंक पाठवण्यासाठी आपला ई-मेल किंवा Whatsapp नंबर अर्जात नमूद करावा, असे आवाहन सहाय्यक भविष्य निधी आयुक्त (पेन्शन) अमित चौगुले यांनी पत्रकाद्वारे केले.
...
16193
कोल्हापूर : न्यू कॉलेजमधील व्याख्यानात बोलताना प्रा. डी. यु. पवार.
घटनात्मक संस्थांची मोडतोड
थांबविणे गरजेचे : प्रा. पवार
कोल्हापूर, ता. १९ : ‘‘घटनात्मक संस्थांची मोडतोड थांबविणे गरजेचे आहे,’’ असे प्रा. डी. यु. पवार यांनी सांगितले.
न्यू कॉलेज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त ‘डॉ. आंबेडकर आणि आजची भारतीय राज्यघटना’ यावर व्याख्यान झाले.
प्रा. डॉ. पवार म्हणाले, ‘‘भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी प्रा. जेनिंग्ज यांना भारतीय नेत्यांनी विनंती केली होती; परंतु महात्मा गांधी यांनी डॉ. आंबेडकरांचे नाव सुचविले. त्यानुसार डॉ. आंबेडकरांनी मसुदा समितीचे अध्यक्ष नात्याने भारतीय संविधानाचा ड्राफ्ट २६ नोव्हेंबर १९४९ ला घटना समितीला सादर केला. २६ जानेवारी १९५० पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली. खासगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपविण्याचा डाव आहे. भारतीय राज्यघटना वाचविण्याची मोठी जबाबदारी भारतीय नागरिकांची आहे. राज्यघटनेचा मुख्य गाभा असलेली स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही मूल्ये जतन करावी.’’
प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी संविधानाचे रक्षण केले तरच भारताची लोकशाही टिकून राहील, असे सांगितले. प्रा. शरद पाटील, डॉ. बी. टी. वाघमारे, प्रा. रघुनाथ ढमकले, प्रा. अरविंद घोडके, प्रा. आर. पी. आढाव, प्रा. सागर देशमुख उपस्थित होते. प्रा. राजरतन जाधव यांनी स्वागत केले. डॉ. मनिषा नायकवडी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. संग्राम पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.