ईद फेस्टीवल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ईद फेस्टीवल
ईद फेस्टीवल

ईद फेस्टीवल

sakal_logo
By

बिंदू चौकात गुरुवारी
ईद फेस्टिव्‍हलचे उद्‍घाटन
कोल्हापूर, ता. २२ ः रमजान ईदनिमित्त बिंदू चौकातील पार्किंग जागेत गुरुवारी (ता. २८) सायंकाळी सहा वाजता आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते ईद फेस्टिव्‍हलचे उद्‍घाटन होणार आहे. येथे सुका मेवा, मसाले, शेवया, साखर, कांदे, लसूण, विविध अत्यावश्‍यक साहित्य ना नफा-ना तोटा तत्त्‍वावर मिळणार आहेत. रमजान ईदपर्यंत फेस्टिव्‍हल सुरू राहणार आहे. या वेळी आर. के. पोवार, निलोफर आजरेकर, हसीना फरास, शारंगधर देशमुख, आदिल फरास, सचिन पाटील, सचिन चव्हाण, संजय मोहिते, पूजा भोर, ईश्‍वर परमार, विनायक फाळके, हरिदास सोनवणे, इंद्रजित सलगर उपस्थित राहणार आहेत. संस्थापक गणी आजरेकर यांनी फेस्टिव्‍हलच्या आयोजनास सुरूवात केली होती. याचा लाभ घेण्याचे आवाहन शौकत बागवान, शकील अत्तार, हमीद बागवान, मलिक बागवान, सईद तांबोळी, मुश्‍ताक ताशिलदार, नीलेश भोसले, जमील बागवान, राजू अत्तार, राजू सुभेदार, राजू यादव, समीर बागवान यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top