राष्ट्रवादी चषक रेंदाळ स्पोर्टसकडे

राष्ट्रवादी चषक रेंदाळ स्पोर्टसकडे

Published on

ich236.jpg
17160
इचलकरंजी ः राष्ट्रवादी चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या रेंदाळ स्पोर्टस् संघाला बक्षीस देताना माजी आमदार राजीव आवळे यांच्यासह मान्यवर.

राष्ट्रवादी चषक रेंदाळ स्पोर्टसकडे
---
इचलकरंजीत टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा; कोहिनूर स्पोर्टसला उपविजेतेपद
इचलकरंजी, ता. २४ ः येथे झालेल्या राष्ट्रवादी चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रेंदाळ स्पोर्टसने विजेतेपद मिळविले. अंतिम सामन्यात कोहिनूर स्पोर्टसचा पराभव झाला. येथील किसनराव आवळे स्पोर्टस् असोसिएशन व किसनराव आवळे प्रतिष्ठानतर्फे स्पर्धा घेण्यात आली. एक लाख रुपये बक्षिसाची स्पर्धा प्रथमच झाली.
तब्बल एक कोटी ४० लाख रुपये खर्च करीत नुकतेच आवळे मैदान येथे क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे. येथे माजी आमदार राजीव आवळे व माजी नगरसेवक अब्राहम आवळे यांच्या सहकार्याने ही स्पर्धा झाली. स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यातून विविध संघांनी सहभाग घेतला होता. गोवा पोलिस, रायबाग स्पोर्टस, कऱ्हाड, कवठेमहांकाळ, मांगले, रेंदाळ, शिरढोण, सांगली, जयसिंपूर, मिरज, भुयेवाडी, इचलकरंजी येथील संघांनी सहभाग घेतला.
तिरुपती स्पोर्टस्- मांगले व रेंदाळ स्पोर्टस् यांच्यात पहिला उपांत्य सामना झाला. यात रेंदाळ स्पोर्टसने अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरा सामना जयसिंगपूर व कोहिनूर स्पोर्टस् यांच्यात झाला. हा सामना अत्यंत अटीतटीचा झाला. सामना कोहिनूर स्पोर्टस् संघाने जिंकून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम फेरीत रेंदाळ स्पोर्टस् (रेंदाळ) व कोहिनूर स्पोर्टस् (इचलकरंजी) या संघांनी धडक दिली.
प्रथम फलंदाजी करताना रेंदाळ स्पोर्टसने सहा षटकांमध्ये ६५ धावा केल्या; तर कोहिनूर स्पोर्टसला सहा षटकांमध्ये ६२ धावा करता आल्या. अखेर रेंदाळ स्पोर्टसने विजेतेपद मिळविले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी इस्माईल शेख, कुमार हजारे, उत्तम कट्टमणी, संभाजी आवळे, आकाश आवळे, अमोल तडाखे, सतीश आवळे यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com