तारेवाडी-हडलगे पुलाचा भराव काढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारेवाडी-हडलगे पुलाचा भराव काढा
तारेवाडी-हडलगे पुलाचा भराव काढा

तारेवाडी-हडलगे पुलाचा भराव काढा

sakal_logo
By

तारेवाडी-हडलगे पुलाचा भराव काढा
---
शेतकऱ्यांची मागणी; जलसंपदामंत्र्यांना दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
नेसरी, ता. २४ : घटप्रभा नदीवरील तारेवाडी-हडलगे पुलाचा भराव टाकला आहे. या मातीच्या बांधामुळे शेतीचे नुकसान होत आहे. पुलाचा हा भराव काढून पाण्याचा प्रवाह पूर्ववत करावा, अशी मागणी तारेवाडी, हडलगे, नेसरी विभागातील शेतकऱ्यांनी केली आहे. मागणीची तत्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
घटप्रभा नदीवर हडलगेच्या बाजूस अंदाजे २०० फूट लांबीचा मातीचा भराव टाकून रस्ता केला आहे. पूल तयार होऊन वाहतुकीस खुला झाला. पण, सदरच्या बांधामुळे बॅक वॉटर चार ते पाच किलोमीटरपर्यंत जाते. त्यामुळे नदीकाठची हजारो एकर शेती बाधित झाली आहे. गेल्या वर्षी पुरामुळे ५० टक्के पिकाचे नुकसान झाले. या ठिकाणची वस्तुस्थिती पाहून पाण्याचा प्रवाह पूल बांधण्यापूर्वी जसा होता, त्याप्रमाणे पूर्ववत करावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी निवेदन स्वीकारले. मारुती पाटील, अजित तुरटे, संभाजी पाटील, चंद्रकांत शिंदे, शंकर देसाई, परसू नाईक यांच्यासह शेतकऱ्यांनी हे निवेदन दिले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top