गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
जागृती शिक्षणशास्त्रमध्ये पुस्तक दिन
गडहिंग्लज : येथील जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन साजरा झाला. यानिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. अनिता मोर्ती यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, प्रा. एस. बी. मगदूम, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. ए. एम. नवले, प्रा. एस. एस. जाधव, अनिल दड्डी, कृष्णकांत बामणे, विकास बुरुड, अमर लोखंडे आदी उपस्थित होते.
--------------
17180
रोहिणी पाटील
रोहिणी पाटीलला सुवर्ण पदक
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयाची खेळाडू रोहिणी पाटील हिने महाराष्ट्र राज्य वरिष्ठ खुल्या मैदानी स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले. ८०० मीटर धावणे प्रकारात तिने हे यश मिळविले. पुणे येथे ही स्पर्धा झाली. संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण, डॉ. महेंद्र जाधव, प्रा. कविता पोळ, मुख्य लिपिक प्रकाश कांबळे यांचे प्रोत्साहन लाभले. शारीरिक शिक्षण संचालक सुरेश धुरे यांचे मार्गदर्शन मिळाले.
-----------------
17181
गडहिंग्लज : आप्पासाहेब कोड्ड यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करताना जे. बी. बारदेस्कर. शेजारी जी. आर. पाटील आदी.
कोड्ड यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
गडहिंग्लज : येथील आप्पासाहेब कोड्ड नुकतेच पोस्टातून अधीक्षक पदावरुन निवृत्त झाले. त्यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य जे. बी. बारदेस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. निवृत्त अधीक्षक जी. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. समीक्षा कोड्ड यांनी स्वागत केले. अमृता कोड्ड यांनी प्रास्ताविक केले. आजही पोस्ट खात्याची प्रतिमा स्वच्छ आहे. लोकांची कामे तत्परतेने केली जात असल्याचे प्राचार्य बारदेस्कर यांनी सांगितले. ए. आर. खोराटे, एस. ई. रेळेकर, बी. आर. सुतार, एम. एस. मर्जे, अशोक पेडणेकर आदी उपस्थित होते. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ कोड्ड यांनी आभार मानले.
------------------
17182
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयातर्फे स्वप्नील पाटील याचा सत्कार करताना डॉ. मंगलकुमार पाटील.
स्वप्नील पाटील उत्कृष्ट स्वयंसेवक
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचा छात्र स्वप्नील पाटील याची महाराष्ट्र बटालियनच्या अखिल भारतीय स्तरावरील १५ दिवसांच्या शिबिरासाठी निवड झाली होती. या शिबिरात फायरिंग, हॉर्स रायडिंग, रोप क्लायम्बिंग अशा विविध प्रकारांत स्वप्नीलने चांगली कामगिरी केली. त्याला उत्कृष्ट स्वयंसेवकाचे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले. कर्नल मंजुनाथ हेगडे, लेफ्टनंट अश्विन गोडघाटे यांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थेच्या अध्यक्षा रत्नमाला घाळी, कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांचे प्रोत्साहन मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.