
बाजार समितीच्या पेट्रोल पंपांचे भुमिपूजन
17224
गडहिंग्लज : बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे कुदळ मारून बांधकाम प्रारंभ करताना राजेश पाटील. शेजारी अभय देसाई आदी.
बाजार समिती बिनविरोध
करण्यासाठी प्रयत्न करू
आमदार पाटील; पेट्रोल पंपाचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : आर्थिक घडी नाजूक बनलेल्या बाजार समितीला होऊ घातलेली निवडणूक पेलणारी नाही. सर्वांच्या मदतीने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले. येथील बाजार समितीच्या पेट्रोल पंपाचे भूमिपूजन झाले. आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते कुदळ मारून बांधकाम प्रारंभ करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. शासन नियुक्त प्रशासक मंडळाच्या सर्व सदस्यांसह भारत पेट्रोलियमचे अधिकारी, बाजार समितीचे कर्मचारी, व्यापारी उपस्थित होते.
प्रशासक मंडळाचे अध्यक्ष अभय देसाई यांनी प्रास्ताविकात बाजार समितीच्या उत्पन्नवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. आमदार पाटील म्हणाले, ‘‘संकेश्वर ते बांदा या राष्ट्रीय महामार्गामुळे या परिसरात पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे बाजार समितीच्या पेट्रोल पंपामुळे बळकट उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल. आवक घटल्याने आर्थिक घडी नाजूक बनलेल्या बाजार समितीला होऊ घातलेली निवडणूक पेलणारी नाही. सर्वांच्या मदतीने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.’’
या वेळी मुकुंद देसाई, प्रा सुनील शिंत्रे, संपत देसाई, जयकुमार मुन्नोळे, भीमराव राजाराम, रोहित मांडेकर, दिग्विजय कुराडे, राजेंद्र गड्ड्याण्णावर, विक्रम पाटील, प्रभाकर खांडेकर, विक्रम पाटील, संभाजी पाटील, बाळासाहेब चव्हाण यासह भारत पेट्रोलियमचे देवेश लोणकर, ज्ञानेश्र्वर बंडकुळे, आकाश गुंडे, अभिनंदन गळतगे उपस्थित होते. राजशेखर यरटे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..