देवांग कोष्टी समाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवांग कोष्टी समाज
देवांग कोष्टी समाज

देवांग कोष्टी समाज

sakal_logo
By

17325
देवांग कोष्टी समाजाची शिक्षणातून उन्नती
श्रीमंत शाहू छत्रपती; कोष्टी समाज बोर्डिंगचा शतकमहोत्सव

कोल्हापूर, ता. २४ ः ‘‘देवांग कोष्टी समाजाने शिक्षणाच्या जोरावर उन्नती करून घेतली असून त्यातूनच हा आदर्श समाज बनत आहे,’’ असे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी सांगितले. देवांग कोष्टी समाज बोर्डिंगच्या शतकमहोत्सव वर्षानिमित्त आज संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात शतक महोत्सव कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. कीर्तीराज मंडलिक उपस्थित होते. वर्षभरात शाहू महाराज समाधीस्थळी दीपोत्सव, शहर स्तरावरील शाहू महाराजांवरील चित्रकला आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा, शोभायात्रा असे विविध उपक्रम घेतले.
श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, ‘‘राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला समतेचा, मानवतेचा विचार आजही लागू आहे. समाजाच्या गरजांमुळे बोर्डिंगची उभारणी झाली. नव्या युगात शिक्षणातील गरजा बदलत आहेत. नवनवीन अभ्यासक्रम येत आहेत. त्यानुसार बोर्डिंगनी लवचिकता आणावी.’’ डॉ. पवार यांनी देवांग कोष्टी समाज बोर्डिंगचा इतिहास सांगितला. इचलकरंजीचे अध्यक्ष विश्वनाथ मुसळे, महाराष्ट्र कोष्टी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सातपुते, किरण तारळेकर, उमेश ढगे, रामदास चोथे, वसंतराव मुळीक, सयाजी झुंजार आदी उपस्थित होते. अनिल भंडारे यांनी स्वागत केले. राजेंद्र ढवळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. गजानन समंग यांनी प्रास्ताविक केले. विशाल मकोटे, योगीराज साखरे यांनी सूत्रसंचलन केले. अध्यक्ष रामचंद्र फातले यांनी आभार मानले.
अविनाश रोडे, राहुल कवडे, राहुल खारगे, विश्वनाथ आमणे, प्रवीण हावळ, महेश ढवळे, राजश्री ढवळे, मंजुश्री कवडे, रूपाली कवडे, सायली मकोटे, अनिता ढवळे, रूपाली मकोटे, वनिता ढवळे यांनी नियोजन केले. राम मकोटे, विलास मकोटे, बळीराम कवडे, पांडुरंग कवडे, प्रशांत आमणे, संजय मकोटे, सुरेश वीर, शशांक मकोटे, रूपेश रोडे, शैला मोरे, शुभांगी कवडे, शोभा गांजवे उपस्थित होते.

कृतज्ञता सत्कार
समाजाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत रावसाहेब मंडलिक यांच्या विशेष योगदानाप्रती त्यांच्या वारसदारांचा कृतज्ञता सत्कार, तसेच देवांग कोष्टी समाज चौंडेश्वरी मंदिर व बोर्डिंग या दोन्ही संस्थांना यशोशिखरावर नेण्यास योगदान देणाऱ्या माजी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यात दिवंगत नामदेवराव रोडे व गोपाळराव रोडे यांचा परिवार, दिवंगत सूर्यकांत कवडे यांचा परिवार, रामचंद्र फातले, दिवंगत महादेव बुचडे यांचा परिवार, बळीराम कवडे, महादेवराव इदाते, पांडुरंग कवडे, विलास मकोटे, शंकरराव कांबळे, दत्तात्रय ढवळे यांचे सत्कार झाले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top