फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुटबॉल
फुटबॉल

फुटबॉल

sakal_logo
By

१७३५७,५८
 
शिवाजी तरुण मंडळ अंतिम फेरीत
के.एम. चषक फुटबॉल स्पर्धा; बालगोपालवर विजय
कोल्हापूर, ता. २४ : शिवाजी तरुण मंडळने आपली विजयी घोडदौड सुरू ठेवत के.एम. फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले. बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध झालेल्या सामन्यात शिवाजी मंडळने २ - ० ने विजय मिळवत साखळी फेरीत दोन सामन्यांत ६ गुणांची कमाई केली. झुंजार क्लब आयोजित के.एम. चषक फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या मंडळ विरुद्ध बालगोपाल सामना एकतर्फी झाला. सामन्याच्या पूर्वार्धात मंडळकडून आक्रमक खेळ झाला. दरम्यान, बालगोपालच्या बचावफळीने अचानक प्रतिआक्रमण करत गोलजाळी भेदण्याचा प्रयत्न केला मात्र, फुटबॉल गोलखांबावर आदळून बाहेर गेला. सामन्याच्या ३० व्या मिनिटाला मंडळच्या योगेश कदमने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात बालगोपालने आक्रमक चाली करत मंडळ समोर आव्हान निर्माण केले. यामध्ये रोहित कुरणे, अभिनव साळोखे, ऋतुराज पाटील यांनी चांगला खेळ केला. निर्धारित वेळेनंतर अधिकच्या वेळेत मंडळाच्या संकेत साळोखेने आणखीन एक गोल करत संघाला २ - ० असा विजय मिळवून दिला. या विजयासह साखळी फेरीत सर्वाधिक गुण कमावत मंडळने अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्‍चित केले. योगेश कदमला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

आजचा सामना
दुपारी ४ वाजता दिलबहार तालीम मंडळ वि. फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top