१५ व्या वित्त आयोगातून २० कोटींचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१५ व्या वित्त आयोगातून २० कोटींचा निधी
१५ व्या वित्त आयोगातून २० कोटींचा निधी

१५ व्या वित्त आयोगातून २० कोटींचा निधी

sakal_logo
By

लोगो- जिल्‍हा परिषद
ॅ-
’१५ व्या वित्त’मधून २० कोटी निधी
प्रशासकांकडून होणार पहिल्यांदाच वितरण; आवश्यक कामांनाच मिळणार प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता.२५:जिल्‍हा परिषदेला १५ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०२१,२२ या आर्थिक वर्षात अबंधित निधीचा २० कोटींचा दुसरा हप्‍ता मिळाला आहे. मागील निधी वितरणावेळी जिल्‍हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या सुचनेनुसार व मागणीनुसार वितरण केले होते. यावेळी मात्र जिल्‍हा परिषदेवर प्रशासक असल्याने निधीचे वितरण काटेकोर होणार आहे. एकाही कामावर अवास्‍तव खर्च होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्‍हाण यांनी दिल्या आहेत.
जिल्‍हा परिषदेला यापूर्वी १५ व्या वित्त आयोगाचा पहिला हप्‍ता मिळाला होता. यावेळी प्रशासकीय कारकिर्दीत दुसरा हप्‍ता मिळाला आहे. लोकप्रतिनिधी असताना अनेकवेळा आवश्यक कामांपेक्षा अनावश्यक कामासाठीच तरतूद होत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. बहुतांश कामे ही रस्‍ता, गटर्स आणि पेव्‍हिंग ब्‍लॉक अशीच घेतली. यावेळी मात्र या कामांपेक्षा शिक्षण, आरोग्याच्या प्राथमिक सुविधा, पाण्याचे स्‍त्रोत बळकटीकरण तसेच नाविण्यपूर्ण उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे. महत्‍वाचे म्‍हणजे निधी वितरणासाठी तयार होणारी यादी अनेक चाळणीतून जाणार आहे.
वित्त आयोगाच्या प्रत्येक रुपयाचा हिशेब ठेवला जाणार असून, ही रक्‍कम योग्य त्या कामावरच खर्च होते का ते पाहिले जाणार आहे. कामांची अंदाजपत्रके तयार करताना बांधकाम विभाग असो की पाणी पुरवठा विभाग यांना डोळ्यात तेल घालून करावे लागणार आहे.

चौकट
’त्यांना’ सक्‍त सूचना
यापूर्वी कंत्राटदार किंवा सदस्य देईल ते अंदाजपत्रक मंजूर केले जात होते. मात्र, येथून पुढे प्रशासकीय कार्यकाळात अशा प्रकारची अंदाजपत्रके सादर केली तर संबंधितांवर कारवाई करण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे. एकाच कामावर दोन, तीन वेळा निधी खर्च करण्याची काही तालुक्यांची परंपरा आहे. त्यांनाही सक्‍त सूचना दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top