
पर्यटनाच्या दर्जाबाबत शाहूवाडीत उदासिनतेचे चित्र
80982
आंबा परिसराला
पर्यटन विकासाची आस
ब दर्जासह भरीव निधीची गरज
सकाळ वृत्तसेवा
आंबा; ता. ७ ः जैवविविधतेने नटलेल्या सह्याद्रीच्या पश्चिम घाटाचा जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. महाबळेश्वरपाठोपाठ आंबा गिरीस्थान थंड हवेसाठी प्रसिद्धीस आले आहे. येथे पर्यटनपूरक अनेक बाबीं आहेत. मात्र इच्छाशक्ती अभावी गेले पंधरा वीस वर्षे आंबा गिरीस्थान व परिसर पर्यटन विकासाचे स्वप्न पहात आहे. येथील पर्यटनाला ब दर्जा मिळाल्यास मूलभूत सुविधांसाठी भरीव निधी मिळणे शक्य होईल.
शिवकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा, विपुल जैवविविधतेने नटलेली निसर्गसंपदा व बाराही महिने पर्यटकांना गारवा देणारे आल्हाददायक वातावरण असुनही येथील पर्यटनाच्या दर्जाबाबत उदासीनतेचे चित्र आहे. घोषणा आणि आश्वासनापलीकडे येथील पर्यटनाला गती मिळालेली नाही. मिनी महाबळेश्वर म्हणून उदयास येत असलेल्या आंबा गिरीस्थानाकडे फारसे लक्ष दिले गेलेले नाही. परिसरात डोळ्यांचे पारणे फेडणारी विहंगम ठिकाणे आहेत. आंबा - विशाळगड हा वीस किलोमीटरचा जंगलातील प्रवास, वन्य पशुपक्षी, निसर्ग माहिती केंद्र, देवराई, नागमोडी वळणाचा घाट, किल्ले विशाळगडावरील हजारो फूट खोल दऱ्या डोळे दिपवून टाकतात. बर्की, मानोली, केर्ले व उखळू येथील पावसाळ्यात फेसाळणारे धबधबे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात कांडवण, पालेश्वर व मानोली लघुपाटबंधारे प्रकल्प पर्यटकांना आकर्षित करतात. धोपेश्वर, उदगिरी आणि जुगाई या तीर्थक्षेत्रांकडे भाविकांची सातत्याने गर्दी असते. परंतु ही ठिकाणे भरीव विकासापासून वंचित राहिली आहेत.
.....
दृष्टिक्षेपात...
ऐतिहासिक पावनखिंड
किल्ले विशाळगड
औषधी वनस्पतींचा खजिना
वाघझरा, कोकण पॉइंट,