वन्यप्राण्यांचा आधार असलेला '' वाघझरा ''
02283
आंब्यातील वन्यप्राण्यांचा आधार ‘वाघझरा''
पर्यटकांचे आकर्षण; विश्रांतीसाठी वैठक व्यवस्थाही
दिग्विजय कुंभार : सकाळ वृत्तसेवा
आंबा, ता. १० ः आंबा-विशाळगड मार्गावर दाट जंगलात असलेला वाघझरा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. नैसर्गिक पाणवठा असलेला हा वाघझरा वन्य पशुपक्ष्यांचा आधार बनला आहे.
आंबापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर हा वाघझरा आहे.
आंबा ते केंबुर्णेवाडी हा सुमारे पंधरा किलोमीटरचा घनदाट जंगलातून जाणारा मार्ग पर्यटकांना भुरळ घालतो. आंबा गावापासून विशाळगडला जाणाऱ्या रस्त्यावर अवघ्या दोन-तीन किलोमीटर अंतरावर दाट झाडीचे जंगल सुरू होते. वळणावळणाचा रस्ता पार करत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंची गर्द हिरवीगार झाडी मन सुखावून टाकते.
एका वळणावर उजव्या बाजूला वाघझरा मात्र पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. आंबा गिरीस्थानात पर्यटकांची कायम गर्दी असते. पावनखिंड आणि विशाळगडाकडे जाताना मात्र मध्येच जंगलात असलेल्या वाघझरा या पाणवठ्याच्या जागी पर्यटकांची गाडी हमखास थांबते. फार पूर्वी काळी या ठिकाणी वाघ पाणी पिण्यासाठी येत असे; त्यामुळे या ठिकाणाला वाघझरा असे संबोधले जाते, अशी आख्यायिका जुनीजाणती माणसं सांगतात.
जंगलातील या पाणवठ्यावर बारमाही पाणी असल्यामुळे पशु-पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरुपी जलस्त्रोत बनला आहे. वन विभागाने येथे वनतळे उभारले आहे; तर वाघझरा दगडी बांधकामात बांधला आहे. पर्यटकांना विश्रांतीसाठी वैठक व्यवस्था केली आहे. या मार्गावर जंगल सफारी केल्यास राज्यप्राणी शेकरू व गवे येथे हमखास बघायला मिळतात.
चौकट
निरीक्षण मनोरा, स्वच्छतागृहाची गरज
किल्ले विशाळगड व ऐतिहासिक पावनखिंडीकडे जात असताना वाघझऱ्यावर पर्यटकांची कायम वर्दळ असते. कुटुंबासमवेत येणारे पर्यटक येथे थोडा वेळ थांबतात. त्यामुळे येथे पर्यटकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी, निरीक्षण मनोरा व स्वच्छतागृह असणे फारच अत्यावश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

