वाघझऱ्यावर हुल्लडबाजांवर प्रतिबंध घालण्याची गरज

वाघझऱ्यावर  हुल्लडबाजांवर प्रतिबंध घालण्याची  गरज
Published on

02285; 02287; 02288

वाघझऱ्यावरील हुल्लडबाजांना रोखा
निसर्गप्रेमींची मागणी; जेवणावळी, कचऱ्याने विद्रुपीकरण

सकाळ वृत्तसेवा

आंबा, ता. १२ ः आंबा-विशाळगड मार्गावर पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असलेल्या वाघझऱ्यावर पर्यटनाच्या नावाखाली काही हुल्लडबाज पर्यटक नैसर्गिक ठिकाण बाधीत करत आहेत. अशा अतिउत्साही व हुल्लडबाज पर्यटकांवर प्रतिबंध घालण्याची गरज आहे. वन विभागाने अशा पर्यटकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.
पर्यटनाच्या नावाखाली काही अतिउत्साही व हुल्लडबाज पर्यटक वाघझऱ्याचे विद्रुपीकरण करत आहेत. चुली मांडून जेवणावळ्यांचा बेत करतात. येथे विश्रांती घेत जेवणावळ्या आटोपल्यानंतर वाघझऱ्याच्या विहिरीजवळील पाण्यात खरकटी भांडी धुतात. प्लास्टिकच्या बाटल्या, पत्रावळ्या फेकून देत असतात. परिसरातील गर्द झाडीचा फायदा घेत काही पर्यटक मद्यप्राशनही करतात. परिसरात प्लास्टिक, पत्रावळ्या, चुलीतील लाकडामुळे परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे. विश्रांतीसाठी उभारण्यात आलेल्या विसाव्याच्या ठिकाणी अतिउत्साही पर्यटक प्रियजनांची नावे लिहून विसावास्थळांचे विद्रुपीकरण करत आहेत.

चौकट
विहीर, वनतळ्यातही अस्वच्छता
विशाळगडाकडे जाताना जंगल परिसरातील पर्यटकांची वाढती संख्या पाहून पशु-पक्ष्यांची माहिती देणारे होर्डिंग हुल्लडबाज पर्यटकांनी फाडले आहे. वनतळ्याशेजारील विहीर पर्यटकांसाठी जीवनदायी ठरत आहे, परंतु काही पर्यटक विहिरीतील पाण्याचा वापर भांडी धुण्यासाठी करत असल्याने येथील विहिरीचे व वनतळ्याचे सौंदर्य नष्ट होत आहे. पिकनिकच्या नावाखाली पर्यटक कागदी किंवा प्लास्टिकच्या पत्रावळ्या, प्लास्टिक ग्लास, काचेच्या बाटल्या जंगल परिसरात, वनतळ्यात किंवा विहीरीत टाकतात. त्याचा त्रास वन्यप्राण्यांना बसतो.

कोट
वन विभागाच्या माध्यमातून चारवेळा परिसराची स्वच्छता केली आहे. परिक्षेत्रात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. तरीही योग्य नियोजन करून हुल्लडबाज पर्यटकांवर प्रतिबंध घालू. प्रसंगी कारवाईचा बडगा उगारू. स्वतः जातीने या बाबींकडे लक्ष पुरवू.
- सुषमा जाधव, परिक्षेत्र वनाधिकारी, पेंडाखळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com