गोगवे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वाघझऱ्यावर स्वच्छता

गोगवे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वाघझऱ्यावर स्वच्छता
Published on

02292
वाघझऱ्यावर स्वच्छता मोहीम
आंबा, ता. १४ ः गोगवे येथील श्री विलासराव शामराव तळप - पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने क्षेत्रभेटीअंतर्गत वाघझऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
विद्यालयातील शिक्षकांसह नववी व दहावीतील सुमारे ७५ मुलामुलींनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी वनतळे, झरा, प्रवेशद्वार, वनतळ्यापाठीमागील भाग व मुख्य रस्त्याजवळच्या परिसरात स्वच्छता केली. परिसरातील चार पोती प्लास्टिक बाटल्या, मद्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक पत्रावळी व ग्लास गोळा करून कचराकुंडीत एकत्र केले.
मुख्याध्यापक दीपक लाड म्हणाले, ‘पर्यटनाच्या नावाखाली येणारे पर्यटक वाघझऱ्याच्या अस्तित्वाला धोका पोहोचवत आहेत. वाघझऱ्यासारख्या नैसर्गिक ठिकाणाचे पावित्र्य जपले पाहिजे.’
या मोहिमेत मुख्याध्यापक दीपक लाड यांच्यासह शिक्षक राजेंद्र सूर्यवंशी, बाबासो कुंभार, राजेशखर सुर्वे, कर्मचारी आनंदा माने, संदीप पाटील, सागर पाटील सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com