एफआरपी पोटी 2163 कोटी आदा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एफआरपी पोटी 2163 कोटी आदा
एफआरपी पोटी 2163 कोटी आदा

एफआरपी पोटी 2163 कोटी आदा

sakal_logo
By

एफआरपीपोटी २१६३ कोटी आदा
जिल्ह्यातील चित्र; १६ कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी
पंडित सावंत : सकाळ वृत्तसेवा
असळज, ता. १७ : कोल्हापूर जिल्ह्यात १५ सहकारी व ६ खासगी अशा एकूण २१ कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. या साखर कारखान्यांनी गाळप केलेल्या ऊस बिलाच्या एफ. आर. पी. पोटी २१६३ कोटी ६८ लाख शेतकऱ्यांना आदा केले आहेत. जिल्ह्यातील १६ कारखान्यांनी एफ.आर.पी.ची १०० टक्के रक्कम आदा केली आहे.
परतीच्या पावसाने ऑक्टोबरच्या अखेरीस कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरुवात झाली. बहुतांशी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना पहिल्या उचलीपोटी एकरकमी एफ. आर. पी.ची रक्कम देण्याची घोषणा केली. यातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २९०० रुपयांपासून ते ३२०९ रुपयापर्यंत उसाला दर मिळू लागला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून गळीत हंगामाने गती घेतली असून, कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले.
यंदाच्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यातील २१ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केले. या २१ कारखान्यांनी ३१ डिसेंबर २०२२ अखेर ७७ लाख १० हजार ०४० टन उसाचे गाळप केले. डिसेंबर अखेरील गाळप केलेल्या ऊस बिलाच्या एफ. आर. पी. पोटी २३१८ कोटी २७ लाख रुपये शेतकऱ्यांना देय होती. त्यापैकी कारखान्यांनी आतापर्यंत २१६३ कोटी ६८ लाख शेतकऱ्यांना आदा केले आहेत. २१ पैकी १६ कारखान्यांनी एफ.आर.पी.ची १०० टक्के रक्कम आदा केली आहे. अद्याप उर्वरित कारखाने एफ. आर. पी. पोटीची १५४ कोटी रक्कम शेतकऱ्यांना देय बाकी आहे.
----------
चौकट
शंभर टक्के एफ. आर. पी. दिलेले कारखाने
आजरा गवसे, छत्रपती राजाराम कसबा बावडा, छत्रपती शाहू कागल, दत्त शिरोळ, दूधगंगा वेदगंगा बिद्री, जवाहर हुपरी, कुंभी कासारी कुडित्रे, शरद नरंदे, तात्यासाहेब कोरे-वारणा, अथणी शुगर-बांबवडे, डी. वाय. पाटील-असळज, दालमिया आसुर्ले-पोर्ले, गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी, इकोकेन एनर्जी-म्हाळुंगे, अथणी शुगर-तांबाळे, अथर्व इंटरट्रेड-दौलत.