सांगशी केंद्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

सांगशी केंद्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

Published on

01096

सांगशी केंद्रातील विद्यार्थ्यांना
शैक्षणिक साहित्य वाटप

असळज, ता. १० : गरजू व होतकरू विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून अलिप्त राहू नयेत, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ज्ञानाची कवाडे त्यांच्यासाठी सदैव उघडी राहतील; असे प्रतिपादन मुख्याध्यापक महेश नाझरे यांनी केले. गगनगिरी महाराज विश्वस्त ट्रस्ट, सह्याद्री प्रतिष्ठान व शिव विचार प्रतिष्ठान कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सांगशी केंद्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गगनगिरी ट्रस्टचे अध्यक्ष नागोजीराव माने होते.
ज्या समाजातून आपण लहानाचे मोठे झालो त्या समाजाप्रती काहीतरी देणे लागतो या भावनेतून दुर्गम डोंगराळ वस्तीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सांगशी केंद्रातील ८१ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी गौरव जाधव यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची, यश पवार यांनी गडसंवर्धनाची गरज व अक्षय चौगुले यांनी रद्दीदान उपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमास मुस्ताक वडगावे, प्रथमेश नाझरे, डॉ. सागर विभूते, केंद्रप्रमुख आर. यु. गांगुर्डे, प्राचार्य रंगराव गोसावी, मुख्याध्यापक महेश दावणे, सांगशी केंद्रातील मुख्याध्यापक, शिक्षक-पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यामंदिर नरवेली शाळेचे मुख्याध्यापक महेश नाझरे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन समृद्ध नाईक यांनी तर प्रा. रंगराव गोसावी यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.