सह्यगिरी युवा टीमकडून छत्र्या वाटप.

सह्यगिरी युवा टीमकडून छत्र्या वाटप.

Published on

01098
सह्यगिरीतर्फे छत्र्या वाटप
असळज : शाळेसाठी पायी चालत येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना सह्यगिरी युवा टीमच्यावतीने छत्र्या वाटप करण्यात आल्या. साळवण येथील श्रीकांत कुंभार मिस्त्री यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सह्यगिरीकडे छत्र्या सुपूर्द केल्या होत्या. छत्र्यांचे वाटप जर्गी, म्हालदारवाडी, वेतवडे, बालेवाडी, शेळोशी येथील विद्यार्थ्यांना करून युवा टीमने सामाजिक भान जपले. जर्गी, म्हालदारवाडी, शेळोशी इत्यादी ठिकाणी शाळेसाठी पायी येणाऱ्या मुलांची संख्या अधिक आहे. पावसातून ही मुले सुखरुप येण्यासाठी छत्र्या वाटप झाले. यावेळी मुख्याध्यापक संजय देसाई, क्रांतिसिंह सावंत, श्रीपती तेली, गणपती पालव, डी. जी. पाटील, भैरनाथ शिंदे, संभाजी पाटील, सुप्रीम शिंदे, मंडलिक जाधव आदींच्याहस्ते छत्र्या वाटप झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.