खोकुर्ले येथे भरवस्तीत पुन्हा बिबट्या, नागरिक भयभीत, वनविभागाला निवेदन

खोकुर्ले येथे भरवस्तीत पुन्हा बिबट्या, नागरिक भयभीत, वनविभागाला निवेदन

01647
खोकुर्ले : वन विभागाला निवेदन देताना ग्रामस्थ.
...
खोकुर्लेत बिबट्याकडून कुत्रे फस्त
नागरिकांत भितीचे वातावरणः वनविभागाला दिले निवेदन
असळज, ता.१० : खोकुर्ले (ता.गगनबावडा) येथे बिबट्याने भरवस्तीत लक्ष्मण येसबा पाटील यांच्या घराबाहेर कुत्र्यावर हल्ला करून कुत्रे फस्त केले. परिणामी नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत खोकुर्ले ग्रामस्थांच्यावतीने वनविभागाला निवेदन देण्यात आले.
खोकुर्ले येथे भरवस्तीमध्ये लक्ष्मण पाटील व यशवंत तुकाराम पाटील यांच्या घराभोवती बिबट्याने फिरून कुत्र्यावर हल्ला केला. गावामध्ये गेले काही दिवस बिबट्याने अनेक पाळीव कुत्र्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारले आहे. शनिवारी रात्री येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांच्या घराबाहेर असलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून हा कुत्रा फस्त केला. खोकुर्ले येथील भरवस्तीत बिबट्या घुसल्याने आम्ही जगायचे कसे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यापूर्वी येथील शेतमजूर धोंडीराम गायकवाड यांच्या घराजवळील गोठ्यामध्ये बिबट्याने शेळी ठार मारून नेली होती तर बाळू कसबले यांच्या गोठ्यामध्येही बिबट्याने प्रवेश करून कुत्र्यावर हल्ला केला होता. वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या स्पष्ट दिसत आहे. बिबट्याच्या मानवी वस्तीमधील प्रवेशाने नागरिक व शेतकरी वर्गामध्ये घाबरट पसरली आहे. शेतकरी व दुग्धव्यवसाय करणारे नागरिक या चिंतेने धास्तावले असून जनावरांची वैरण व शेतकाम करण्यास घाबरत आहेत.
दरम्यान,याबाबतचे निवेदन वनकर्मचारी संग्राम पाटील, पांडुरंग पाटील, आनंदा पाटील यांना ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले. यावेळी सरपंच सुनिता कांबळे, रामचंद्र पाटील, बाजीराव पाटील, रंगराव पाटील, संदीप पाटील, प्रकाश पाटील, पोलिस पाटील कैलास इंजर, विष्णू पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com