उदयसिंह पाटील यांना अभिवादन

उदयसिंह पाटील यांना अभिवादन

01708
उदयसिंह पाटील
यांना अभिवादन

असळज, ता. १० : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन (कै.) उदयसिंह सीताराम पाटील यांच्या अठराव्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांना विविध ठिकाणी अभिवादन केले. पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी संचालक मानसिंग पाटील, अभय बोभाटे, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील, विक्रमसिंह पाटील, यश पाटील, राजेंद्र शींदे, एस. बी. पाटील, संदीप गावकर, खातेप्रमुख, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उदयसिंह उर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालयात संस्थापक उदयसिंह पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी मुख्याध्यापक बी. डी. दळवी यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com