गगनबावडा- कोल्हापूर मार्गावर मांडुकलीजवळ अपघात, एकजण जखमी.

गगनबावडा- कोल्हापूर मार्गावर मांडुकलीजवळ अपघात, एकजण जखमी.

01746

मांडुकली : येथे झालेल्या अपघातात टँकर व मोटारीचे मोठे नुकसान झाले.
...

मांडुकलीजवळ अपघातात एकजण जखमी

भरधाव टँकरची मागील लोखंडी टाकी तुटली

गगनबावडा, ता. ८ : भरधाव टँकरची मागील लोखंडी टाकी तुटल्याने टँकर व मोटार यांच्यात झालेल्या अपघातात मोटारचालक किरकोळ जखमी झाला. गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावर मांडुकली (ता. गगनबावडा) येथील सरिता मापन केंद्राजवळ आज दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अशोक आनंदा पडवळ (वय ५१) हे मोटार (क्र. एमएच ४६ पी ३७५३) मधून खोकुर्लेहून साळवणला निघाले होते; तर टँकर (क्र. एनएल ०१ एजी ३७५०) मागील टाकीत सिमेंट भरून कर्नाटकहून गगनबावड्याकडे जात होता. मांडुकली येथील सरिता मापन केंद्रानजीकच्या वळणावर ही दोन्ही वाहने आली असता, टँकर भरधाव वेगात असल्यामुळे चालकाचे येथील वळणावर टँकरवरील नियंत्रण सुटले. यात टँकरच्या मागील सिमेंटने भरलेली लोखंडी टाकी तुटून रस्त्यावर पडली. समोरून येणाऱ्या मोटारच्या चालकाकडील बाजूस व पुढील बाजूस टाकीची जोराची धडक बसल्याने अपघात झाला. यात मोटारचालक पडवळ किरकोळ जखमी झाले, तर अपघातात टँकर व मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर टँकरचालक पळून गेला. मोटारचालक पडवळ यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, निवडे येथे दाखल करण्यात आले.
अपघातामुळे गगनबावडा -कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून जेसीबीच्या साह्याने टॅंकर बाजूला घेतल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. अपघाताची नोंद गगनबावडा पोलिसांत झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल मानसिंग सातपुते अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com