गुणवत्तावान विद्यार्थी घडावेत

गुणवत्तावान विद्यार्थी घडावेत

Published on

‘गुणवत्तावान विद्यार्थी घडविण्याची
जबाबदारी शिक्षकांनी पार पाडावी’
असळज, ता. २ : ‘‘बदलत्या काळाबरोबर प्रत्येक क्षेत्रात स्पर्धाही वाढली आहे. विविध पातळीवर सहज मात करण्याची क्षमता प्राप्त होण्यासाठी गुणवत्तावान विद्यार्थी घडावेत. शाळा व शिक्षकांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडावी,’’ असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी केले. शेळोशी (ता. गगनबावडा) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास भेट दिली असता आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्याध्यापक वाय. ए. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी शालेय व्यवस्थापन, शालेय पटनोंदणी, शालेय वार्षिक नियोजन, घटक नियोजन, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, शालेय पोषण आहार, भौतिक सुविधा, पाठ टाचन, मोफत शालेय पुस्तके वाटप, शालेय वार्षिक नियोजन, शिष्यवृत्ती परीक्षा, शालेय परिसरात वृक्षारोपण याबाबत चर्चा केली. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थीकेंद्रित करण्याचे आवाहन आंबोकर यांनी केले. प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शालेय कामकाज पाहून समाधान व्यक्त केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी जयश्री जाधव, पी. एल. पाटील, व्ही. ए. कुंभार, आर. बी. पाटील, पी. आर. चौगले आदींसह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. ए. बी. पाटील यांनी सूत्रसंचालन तर विजय पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.