मोहिते-पाटील विद्यालयात हिवताप, डेंगू जनजागरण कार्यशाळा उत्साहात संपन्न

मोहिते-पाटील विद्यालयात हिवताप, डेंगू जनजागरण कार्यशाळा उत्साहात संपन्न

Published on

01811
मोहिते-पाटील विद्यालयात
साथरोग जागृती कार्यशाळा

साळवण, ता. २ : प्राथमिक आरोग्य केंद्र निवडे व दत्ताजीराव मोहिते-पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तिसंगी यांच्या संयुक्त विद्यमाने हिवताप, डेंगू जनजागरण कार्यशाळा उत्साहात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. जी. काटकर होते.
यावेळी आरोग्यसेवक ए. एच. बरगे यांनी डेंगी, हिवताप व मलेरिया या आजाराची लक्षणे व त्यावरील उपाय याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य एस. जी. काटकर म्हणाले, ‘‘सध्या पावसामुळे पाणी दूषित बनले आहे. पाणी उकळून प्यावे. डेंगी व अन्य आजाराची लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घराच्या परिसरात स्वच्छता राखा.’ यावेळी पर्यवेक्षक ए. बी. नाईक, आरोग्य सहाय्यक बी. एम. परीट, आरोग्यसेवक जी. पी. गुरव, पी. बी. डेळेकर, डाटा ऑपरेटर रंगराव चौधरी, आर. एम. मोहिते-पाटील, डी. आर. खुटाले आदीसह विद्यार्थी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संतोष देसाई यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.