गगनगडावर आज दत्तजयंतीचा मुख्य सोहळा, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

गगनगडावर आज दत्तजयंतीचा मुख्य सोहळा, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

Published on

2065
गगनगड
.............
दत्त जयंतीनिमित्त गगनगडावर
धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
गगनबावडा, ता. १३ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी गगनगिरी महाराजांची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनगडावर दरवर्षीप्रमाणे शनिवार (ता. १४) दत्त जयंतीचा सोहळा साजरा होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून, दत्तजन्म सोहळ्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती व्यवस्थापक रमेश माने, बापूसाहेब पाटणकर, संजय पाटणकर यांनी दिली.
दत्त जयंतीनिमित्त गगनगडावरील परमपूज्य गगनगिरी महाराजांच्या आश्रमात भाविकांची मांदियाळी जमू लागली आहे. पाटण ते गगनगड, मनोरी व तळकोकणातून‌ आलेल्या पायी दिंड्या गगनगडावर दाखल झाल्या आहेत. १३ ते १६ डिसेंबर असे सलग चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शनिवार दत्त जयंतीचा मुख्य सोहळा गगनगड पठारावर साजरा होणार आहे. महारुद्र आरंभ, महाप्रसाद, आरती, स्वामी गगनगिरी महाराजांचा पालखी सोहळा, दत्त जन्मसोहळा, मंत्रपुष्पांजली, रात्री कोल्हापूरचे दिग्दर्शक राजेंद्र मेस्त्री यांचा ‘अवघा रंग एक झाला’ हा नाद सुरमई कार्यक्रम आयोजित केला आहे. गगनगडावरील सर्व मंदिरांना रंगरगोटी केली असून आकर्षक विद्युत रोषणाईने गगनगड उजळून निघाला आहे. गगनबावडा ग्रामपंचायतीने दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहीम राबविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com