तेरा महिन्यानंतर करुळ घाटातून धावली एस टी बस..
तेरा महिन्यानंतर
करुळ घाटातून
धावली एस. टी.
गगनबावडा: करूळ घाटातून एकेरी बस वाहतूक सुरू करण्यास परवानगी मिळाली अन् तेरा महिन्यापासून बंद असलेली सर्वसामान्य प्रवाशांची लालपरी आज करुळ घाटातून धावली. या मार्गावर एकेरी एसटी वाहतूक सुरू झाली. कोल्हापूर-तळेरे या महामार्गावरील करूळ घाटमार्गाच्या नूतनीकरणाचे काम जानेवारी २०२४ मध्ये सुरू झाले. त्या दिवसापासून हा घाटमार्ग वाहतुकीस बंद केला होता. त्यामुळे या घाटमार्गाने सुरू असलेली एसटी बससेवाही बंद झाली होती. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. काही एस टी बस भुईबावडा घाटमार्गे वैभववाडीत येत होत्या. दरम्यान, २४ फेब्रुवारीपासून करूळ घाटमार्गे एकेरी वाहतुकीला सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्ग प्रधिकरणला परवानगी दिली. त्यानंतर वैभववाडीहुन कोल्हापूरकडे वाहतूक सुरू झाली; मात्र बससेवा सुरू झाली नव्हती. एसटी प्रवाशांकडून बससेवा सुरू व्हावी, अशी वारंवार मागणी सुरू होती.
-
गजानन पाटील
शेती उत्पन्न बाजार
समितीचे सचिव
कोल्हापूर ः शेती उत्पन्न बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांची ३१ मार्चला मुदत संपत आहे या पार्श्वभूमीवर गजानन पाटील यांच्याकडे बाजार समितीचा पद भार आज देण्यात आला. शेती उत्पन्न बाजार समितीत सचिव पाटील हे सेवानिवृत्त झाले, त्यानंतर त्यांना दिलेली मुदत वाढ येत्या ३१ मार्च पर्यंत संपणार आहे तत्पूर्वी बाजार समितीचे सभापती तसेच संचालक मंडळासमोर आज दुपारी त्यांनी पदाची सूत्रे गजानन पाटील यांच्याकडे सोपवली आहेत. त्यांच्यासोबत वसंत पाटील व तानाजी दळवी यांच्याकडे उपसचिव पदाचा पदभार आहे.
-
जीबी सिंड्रोममुळे
एका रुग्णाचा मृत्यू
कोल्हापूर ः सीपीआरमध्ये जीबीएस सिंड्रोमच्या एका रुग्णाचा सोमवारी मृत्यू झाला तर आज एका रुग्णांची प्रकृती सुधारल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सिपीआरमध्ये जीबीएस सिंड्रोमवर उपचार घेणाऱ्यांची संख्या १४ झाली आहे. यात तिघांची प्रकृती अद्यापि गंभीर आहे. अशी माहिती सीपीआरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी दिले.
-
03394
हुपरीत एकाची
आत्महत्या
हुपरी: रेंदाळ येथील एका चांदी आटनी कामगाराने येथे दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. विकास विलास सुर्यवंशी ( वय ३८ रा. माने नगर रेंदाळ) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी धनराज दिनकर सुर्यवंशी यांनी हुपरी पोलिस ठाण्यात वर्दी दिली आहे.
--
दोन घरफोडीचा
लावला छडा
गोकुळ शिरगाव : गोकुळ शिरगाव एमआयडीसी परिसरात झालेल्या दोन घरफोडीच्या घटना उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक करून १ लाख १४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
२८ फेब्रुवारीला श्री समर्थ इंजिनिअरिंगमधून ५७, ६०० रुपयांचे २४० किलो अॅल्युमिनिअमचे इमर्नॉट चोरले. १ ते २ मार्च दरम्यान ११३ बेअरिंग हाऊसिंगचे तयार जॉब चोरले. हातीम इस्माईल मुल्लानी (वय २९, रा. कणेरी, ता.करवीर, जिल्हा कोल्हापूर), अजित अशोक कांबळे (वय २६,रा. माधवनगर कणेरी, ता.करवीर, जिल्हा कोल्हापूर), शिवचरण रमेश खंडेल (वय २७,माधवनगर कणेरी, ता.करवीर, जिल्हा कोल्हापूर) आणि सलमान मुरादअली मुलला (वय ३४, कणेरीवाडी, ता.करवीर, जिल्हा कोल्हापूर) यांना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

