मार्गेवाडीतील होळी उत्सवास सुरुवात

मार्गेवाडीतील होळी उत्सवास सुरुवात
Published on

02274

मार्गेवाडीतील होळी उत्सवास सुरुवात

साळवण, ता. १४ : मार्गेवाडी (ता. गगनबावडा) येथील ''होळी'' मानाची व नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे रंगपंचमीपर्यंत चालणाऱ्या होळी सणाच्या उत्सवाला गुरुवारपासून पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. होळी उभी करून ग्रामस्थांनी विधिवत पूजा केली. त्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
या सणाला विविध ठिकाणाहून भाविक, माहेरवाशिणी मोठ्या संख्येने येतात. गुरुवारी दरवर्षीप्रमाणे होळी उभी केली. आबालवृद्ध मंडळींनी उभ्या केलेल्या होळीचे विधिवत पूजन केले. त्यानंतर जवळपास तासभर गा-हाण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रंगपंचमीपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी सरपंच परशुराम खानविलकर, उपसरपंच जोतिराम जाधव, कुंडलिक मार्गे, पोलिसपाटील सागर मार्गे, ग्रामपंचायतीचे सदस्य, हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान गगनबावडा तालुक्‍यात होळी सण व धुलिवंदन पारंपारीक पध्‍दतीने उत्‍साहात साजरा झाला. होळीचे पूजन करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. होळीच्‍या शेजारी गोवऱ्यांचा ढीग रचून मध्‍यभागी काठीवर पोळी उभी केली जाते. त्‍यानंतर या गोवऱ्यांचा ढीग पेटविला जातो. सरतेशेवटी मध्‍यभागी असणारी पोळी ज्‍या दिशेला पडेल त्‍या दिशेचे पीक चांगले येईल असा समज लोकांमध्‍ये आहे. होळीच्‍या दुसऱ्या दिवशी अनवाणी चालून धुळीला म्‍हणजेच धरणीमातेला वंदन केले जाते. या दिवशी अनवाणी चालण्‍याची प्रथा आजही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com