पाच कातकरी कुटूंबांना घरकुल मंजूरी आदेशाचे वाटप

पाच कातकरी कुटूंबांना घरकुल मंजूरी आदेशाचे वाटप

Published on

02276
पाच कातकरी कुटुंबांना
घरकुल मंजुरी आदेशाचे वाटप

गगनबावडा, ता. १४ : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभिमान आवास योजनेंतर्गत पंचायत समिती गगनबावड्यामार्फत घरकुल मंजुरीचे आदेश देण्यात आले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूरच्या प्रकल्प संचालिका सुषमा देसाई यांच्या हस्ते सैतवडेपैकी पारगावकरवाडी (ता.गगनबावडा) येथील पाच कातकरी कुटुंबांना घरकुल मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले.
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानअंतर्गत गतवर्षीपासून प्रशासनाने सैतवडेपैकी पारगावकरवाडी येथे वास्तव्यास असलेल्या पाच कातकरी कुटुंबांची दखल घेतली होती. महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या पाच कुटुंबीयांची भेट घेत जातीच्या दाखल्याचे वाटप केले होते. आता घरकुल मंजुरी मिळाल्याने समाजाचा रानावनातील वनवास संपणार आहे. दरम्यान या पाच कुटुंबीयांना प्रत्येकी एक गुंठा याप्रमाणे पाच गुंठे जमीन दिलेल्या सुरेंद्र यशवंत पारगावकर यांचा यावेळी सत्कार झाला.
याप्रसंगी प्रकल्प संचालिका सुषमा देसाई व तहसीलदार बी. जे. गोरे यांनी मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी अलमास सय्यद यांनी लाभार्थ्यांना घरकुले लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत आवाहन केले. याप्रसंगी गगनबावडा पंचायत समितीचे घरकुल स्टाफ राजेंद्र पाटील, उमाकांत पडवळ, विकास पाटील, सांगशी-सैतवडेच्या सरपंच तेजस्विनी भिवाजी वरेकर, उपसरपंच नीलम अभय सावंत, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश जाधव, पोलिसपाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com