मांडुकलीच्या उपसरपंचपदी अश्विनी खेडकर
02414
मांडुकली उपसरपंचपदी
अश्विनी खेडकर
साळवण : मांडुकली (ता. गगनबावडा) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अश्विनी श्रीकांत खेडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजाराम तुकाराम पाटील होते. उपस्थितांचे स्वागत ग्रामसेवक भिवाजी बचाटे यांनी केले. मावळते उपसरपंच ज्ञानदेव पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते. ग्रामपंचायतीच्या सभागृहात बोलविलेल्या बैठकीत उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने अश्विनी खेडकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. सरपंच राजाराम पाटील यांच्या हस्ते नूतन उपसरपंच अश्विनी खेडकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील, ज्ञानदेव पाटील, विद्याताई पडवळ, स्वाती पडवळ, संगीता पडवळ, मालुबाई पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

