

असळजला रस्त्याबाबत फेरविचार करावा
असळज : गगनबावडा तालुक्यातील असळज येथील असळज बाजारपेठ बचाव कृती समितीच्या वतीने कोल्हापूर–गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावरील प्रस्तावित रस्त्याबाबत फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. नव्या रस्त्यामुळे असळज बाजारपेठ पाण्याखाली जाण्याची शक्यता असून व्यापारी व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात आमदार सतेज पाटील यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नवीन महामार्ग हा असळज बाजारपेठ च्या मागून जात आहे.तो बदलून आहे तेथून करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, कारखाना संचालक मानसिंग पाटील, दत्तात्रय पाटणकर, बाळकृष्ण गावकर, विजय गावकर, सागर गावकर, राजेश शिंदे, आदित्य मोरे, उत्तम नागप, डॉ. सागर कुंभार, सचिन सातपुते, दिग्विजय डावरे, प्रकाश मोहित, शौकत थोडगे, अंकुश दाभोळकर, मंगेश खेतल, नितीन नांदिवले, महादेव गावकर, पिंटू गावडे आदी उपस्थित होते. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.