

03209
असंडोलीत रासाईदेवीच्या
दर्शनासाठी हजारो भाविक
यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
साळवण, ता. २१ : त्रेसष्ठ खेड्यांची मालकीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या असंडोली (ता. गगनबावडा) येथील रासाईदेवीची यात्रा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उत्साहात साजरी झाली.
यात्रेनिमित्त रासाई मंदिराच्या प्रांगणात पहाटे महाकाकड आरती संपन्न झाली. या महाकाकड आरतीस गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, करवीर, शाहूवाडी या तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कोकणातील १६०० महिला, वारकऱ्यांसह १ हजारांहून अधिक पुरुष मंडळीची उपस्थिती होती. रासाईदेवीला अभिषेक घालून आरती करण्यात आली. सायंकाळी परंपरेनुसार बैलगाडे सजवून देवीची मिरवणूक काढण्यात आली. बैलांना रंगवून झुला घालून, फुगे बांधून सजवण्यात आले होते. रासाईदेवी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला. यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी रासाईदेवीचे दर्शन घेतले. रात्री करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा झाला. यावेळी यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.