आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अडवणुकीमुळे इरादा पत्राची मंजूरी रखडली

आमदार प्रकाश आबिटकर यांच्या अडवणुकीमुळे इरादा पत्राची मंजूरी रखडली

Published on

‘आमदार आबिटकरांच्या
अडवणुकीमुळे इरादा
पत्राची मंजूरी रखडली’

बिद्री ता. १८ : ‘बिद्री''च्या सहवीज प्रकल्पाची उभारणी, गाळप विस्तारीकरण, इथेनॉल प्रकल्प आदी कामांमध्ये अडथळे आणून विरोधकांकडून चांगल्या चाललेल्या मातृसंस्थेला गालबोट लावण्याचे काम सुरू आहे. यातून कारखान्याचे नुकसान करण्याचे काम विरोधक करत आहेत. इथेनॉल प्रकल्पाचे इरादापत्र आमदार प्रकाश आबिटकर यांनी अडविले असून, या प्रकल्पाच्या दिरंगाईला तेच जबाबदार आहेत असा पलटवार कारखान्याचे संचालक उमेश भोईटे यांनी केला.
विरोधी गटाचे बाबा नांदेकर यांनी इथेनॉल प्रकल्पासबंधी अध्यक्ष के. पी. पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संचालक राजेंद्र पाटील, के. ना. पाटील, प्रविण भोसले, धनाजी देसाई उपस्थित होते.
भोईटे म्हणाले, केंद्र शासनाकडून ६० के.एल.पी.डी. क्षमतेचा इथेनॉल प्रकल्पास मंजूरी मिळाली असून, ६८.१२ कोटी कर्जास व्याज अनुदान मंजूर आहे. लायसन्स घेऊन इथेनॉल प्रकल्प उभारणीस सुरू आहे. केंद्र शासनाकडून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यास विचारणा होत असून नियोजित वेळेत तो पूर्ण करण्याचा मानस आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.